पंचवटीत देवी मंदिरांना रंगरंगोटी

By Admin | Updated: October 5, 2015 23:21 IST2015-10-05T23:20:34+5:302015-10-05T23:21:48+5:30

सुरूतयारी नवरात्रोत्सवाची : विविध कार्यक्रमांचे आयोजन

Rangargoti to the temples of Panchavati | पंचवटीत देवी मंदिरांना रंगरंगोटी

पंचवटीत देवी मंदिरांना रंगरंगोटी

पंचवटी : येत्या आठ दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गंगाघाटावरील सांडव्यावरची देवी मंदिरासह पंचवटी परिसरातील ठिकठिकाणच्या देवी मंदिरांना रंगरंगोटी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मंगळवारी (दि.१३) घटस्थापना असल्याने त्यादृष्टीने नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सवाची तयारी सुरू केली आहे. गंगाघाट परिसरात सांडव्यावरची देवी मंदिर असून, या मंदिरात नवरात्रोत्सव कालावधीत शेकडो भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात. नवरात्रोत्सवानिमित्ताने गेल्या चार ते पाच दिवसांपासून मंदिराला रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पंचवटीत नवरात्रोत्सव उत्साहात साजरी करण्याची परंपरा असून, अनेक नवरात्रोत्सव मंडळांतर्फे या कालावधीत गरबारास, तसेच दांडिया नृत्याचे आयोजन केले
जाते.
अवघ्या आठ दिवसांवर नवरात्रोत्सव असल्याने कार्यकर्ते वेळेच्या आत उत्सवाची तयारी करण्यासाठी रात्रीचा दिवस करत असून, सध्या जो तो कार्यकर्ता त्याच्याकडे दिलेल्या जबाबदार्‍या पार पाडण्याचे काम प्राधान्याने करत असल्याचे चित्र दिसून येत
आहे. (वार्ताहर)

Web Title: Rangargoti to the temples of Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.