रंगला रंगोत्सव
By Admin | Updated: March 19, 2017 00:55 IST2017-03-19T00:55:04+5:302017-03-19T00:55:16+5:30
नाशिक : विविध रंगांची उधळण करत शहर परिसरात पारंपरिक पद्धतीने शुक्रवारी (दि. १७) रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली

रंगला रंगोत्सव
नाशिक : विविध रंगांची उधळण करत शहर परिसरात पारंपरिक पद्धतीने शुक्रवारी (दि. १७) रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्यावर्षी पाणीटंचाईचा फटका बसला होता. त्यापार्श्वभूमीवर यंदा कोणत्याही निर्बंधांशिवाय आबालवृद्धांनी रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटला.जुन्या नाशकातही रंगपंचमी जल्लोषातजुने नाशिक परिसरात यावर्षी जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात आली. पेशवेकालीन परंपरा लाभलेल्या तसेच नाशिकच्या रंगपंचमीचे विशेष महत्त्व असलेल्या रहाडींमध्येही युवकांनी उड्या मारत मोठ्या जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. यावर्षीच्या रंगपंचमीसाठी जुन्या तांबट लेनमधील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीने शोध लावलेली रहाडदेखील नाशिककरांसाठी खुली करून देण्यात आली आली होती. रहाडीमध्ये उड्या मारण्याबरोबरच शॉवर्सखाली रेनडान्स करत तरुणाई विविध चित्रपटांच्या गीतांवर थिरकत होती. पंचवटीतील शनी चौक, गोदाकाठावरील संत गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजा परिसरातील तसेच जुन्या तांबट गल्लीतील रहाडींजवळ नागरिकांनी रंगपंचमी खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.नाशिकच्या काळाराम मंदिरातही रंगपंचमीचा विशेष उत्साह बघायला मिळाला. यावेळी देवाला पांढरे वस्त्र परिधान करून देवाची विधिवत पूजा करण्यात आली आणि देवावर केशरी आणि गुलाबी रंगांची उधळण करण्यात आली. प्रत्येक ऋ तूनुसार रामाचे वस्त्र बदलण्यात येत असल्याने यावर्षी रंगपंचमीनिमित्त रामाला पांढरे वस्त्र परिधान करण्यात आले होते. यावर्षी पूजेचे मानकरी असलेल्या चंदन पुजाधिकारी यांच्या हस्ते देवाची पूजा करण्यात येऊन त्यांना वस्त्र परिधान करण्यात आली आणि पारंपरिक पध्दतीने काळाराम मंदिरात रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला.