राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ : महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:10 IST2017-09-18T23:53:00+5:302017-09-19T00:10:53+5:30

नाशिक : नारायण राणे हे काँग्रेसचे मोठे नेते असून, ते कुठे अन् केव्हा सीमोल्लंघन करणार याची मला कल्पना नाही, याबाबत तेच सांगू शकतील़ मात्र ते सध्या काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून वाटते, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले़

 Rane is unwell in Congress: Mahajan | राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ : महाजन

राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ : महाजन

नाशिक : नारायण राणे हे काँग्रेसचे मोठे नेते असून, ते कुठे अन् केव्हा सीमोल्लंघन करणार याची मला कल्पना नाही, याबाबत तेच सांगू शकतील़ मात्र ते सध्या काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून वाटते, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले़
नाशिक जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यूप्रकरणी महाजन यांनी सोमवारी (दि़१८) जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली़ यावेळी पत्रकारांनी, कॉँग्रेसचे नेते नारायण राणे हे भाजपा प्रवेशाबाबत इच्छुक असून, त्यांनी नवरात्रोत्सवात सीमोल्लंघन करण्याचे वक्तव्य केले आहे़ त्यांच्या भाजपा प्रवेशासाठी पक्ष इच्छुक आहे का असे विचारले.यावर महाजन यांनी सांगितले की, काँग्रेसमधील त्यांची अस्वस्थता त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवते़ पुढील निर्णय घेण्यासाठी ते सक्षम असून, त्यांचा निर्णय काय असेल हे सांगता येणे कठीण आहे़ भाजपाच्या भूमिकेबाबत विचारले असता पालकमंत्री महाजन यांनी मिश्कीलपणे परिषद आटोपल्याचे सांगत विषय टाळला.

Web Title:  Rane is unwell in Congress: Mahajan