शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता संपली; आता कामांची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 19:56 IST

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असले तरी, त्यासाठी २१ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केली होती. त्यामुळे आचारसंहिता जारी झाल्यापासून महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, पंचायत समित्या,

ठळक मुद्देप्रशासनाची धावपळ : लोकप्रतिनिधींचा मार्ग मोकळा लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास तीन महिने निवडणूक आचारसंहिता

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या दीड महिन्यापासून लागू असलेली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अखेर संपुष्टात आली असून, आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे पाच महिने शिल्लक असल्याने आता शासकीय पातळीवर कामांची घाई सुरू झाली आहे. आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली कामे, रखडलेल्या शासकीय योजनांच्या फाईलींवरील धूळ झटकण्यात येऊन कामे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींचीही धावपळ उडणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असले तरी, त्यासाठी २१ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केली होती. त्यामुळे आचारसंहिता जारी झाल्यापासून महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, आदिवासी आयुक्त कार्यालय ते सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील कामकाजावर परिणाम झाला होता. कोणत्याही नवीन कामांना मंजुरी बंद करण्यात आली, त्याचबरोबर व्यक्तिगत व सार्वजनिक लाभाच्या योजनांनाही थंड बस्त्यात बांधून ठेवण्यात आले. मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही कृत्य वर्ज्य करण्यात आल्यामुळे कामे ठप्प झाली होती. चालू वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास तीन महिने निवडणूक आचारसंहिता जारी असल्यामुळे जिल्ह्यातील विकासकामे रखडली होती. लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात येताच प्रशासनाने नवीन कामांची घाई सुरू करताच, पुन्हा दोनच महिन्यांत निवडणूक आचारसंहितेचे सावट विकासकामांवर आले. साधारणत: दीड महिने विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे कोणतेही कामकाज होऊ शकलेले नाही. जिल्हा नियोजन समितीने यंदा कोट्यवधी रुपयांची तरतूद विकासकामांसाठी करून ठेवली असून, निवडणूक आचारसंहितेमुळे वर्षातील पाच महिने कोणतेही कामकाज शासकीय यंत्रणेला करता आलेले नाही. त्यामुळे आगामी पाच महिन्यांत शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे त्याचबरोबर अपूर्ण कामे, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची कसोटी लागणार आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबर रोजी जाहीर झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने २५ आॅक्टोबरपासून निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आणल्याचे पत्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविले होते. मात्र त्यांनी ३० आॅक्टोबरपासून निवडणूक आचारसंहिता संपुष्टात येत असल्याचे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना कळविले आहे. आयोगाचे पत्र प्राप्त होताच, शासकीय कार्यालयातील विकासकामांच्या फाईलींवरील धूळ झटकण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनीदेखील मतदारसंघातील पूर्ण, अपूर्ण तसेच नवीन कामांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदNashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद