मुंबईच्या मॉडेल्सचा नाशकात ‘रॅम्प वॉक’

By Admin | Updated: June 22, 2014 00:14 IST2014-06-21T23:58:04+5:302014-06-22T00:14:38+5:30

मुंबईच्या मॉडेल्सचा नाशकात ‘रॅम्प वॉक’

'Ramp walk' in Mumbai's Nashik Nashik | मुंबईच्या मॉडेल्सचा नाशकात ‘रॅम्प वॉक’

मुंबईच्या मॉडेल्सचा नाशकात ‘रॅम्प वॉक’

 

नाशिक : मोती वर्क, रॉयल राजस्थान, कॅमरा अर्नाटिको, ब्रास नाईट शॅडो, फॅशन आर्ट आदि संकल्पनांवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील मुंबईच्या सोळा मॉडेल्स यांच्या ‘रॅम्प
वॉक’चा जलवा नाशिककरांनी अनुभवला.
निमित्त होते, कॉलेजरोडवरील आयएनएफडी फॅशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित ‘आॅरा-२०१४’ या अनोख्या फॅशन शो चे! संस्थेच्या अंतिम वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या डिझायनर्सच्या प्रकल्पामधील विविध कपड्यांच्या अनोख्या डिझाईन रॅम्प वॉक करत मॉडेल्स यांनी प्रेक्षकांसमोर सादर केले. दरम्यान, एकूण ७० प्रशिक्षणार्थी डिझानर्सकडून तयार करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या फॅशनेबल डिझाईनचे एकूण आठ शो द्वारे मॉडेल्सकडून सादरीकरण करण्यात आले. आकर्षक अशा आगळ्यावेगळ्या रोषणाईच्या झगमगाटामध्ये मॉडेल्सकडून केले जाणारे ‘रॅम्प वॉक’ने अनेकांना थक्क केले. प्रत्येक शो च्या अखेरीस त्या शो-स्टॉपर्स यांनी मॉडेल्ससोबत रॅम्पवर येऊन आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमात अक्षी खारी, सुश्मिता सिंग, नूपुरा भास्कर, सोमाना चक्रवर्ती, पूजा ब्राह्मे, नम्रता गुजराल, मालविका राज यांच्यासह आदि मॉडेल्सनी सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)

Web Title: 'Ramp walk' in Mumbai's Nashik Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.