सिडको परिसरात रामनवमी उत्साहात
By Admin | Updated: April 16, 2016 23:28 IST2016-04-16T23:10:27+5:302016-04-16T23:28:54+5:30
सिडको परिसरात रामनवमी उत्साहात

सिडको परिसरात रामनवमी उत्साहात
सिडको : उत्तमनगर येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’, सियावर रामचंद्र की जय, श्रीराम जय राम जय जय राम’चा जयघोष करीत भाविक प्रभू श्रीराम चरणी नतमस्तक झाले. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. सकाळी पुजारी अॅड. नंदकिशोर उपासनी, अविनाश उपासनी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा महाअभिषेक करण्यात आला. सोपान महाराज सोनवणे यांच्या भजन व कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी १२ वाजता खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब पाटील, महेश हिरे, नाना महाले, दत्ता पाटील, नगरसेवक राजेंद्र महाले, डी. जी. सूर्यवंशी, नगरसेवक रत्नमाला राणे, शीतल भामरे, कल्पना पांडे, सुवर्णा मटाले, डॉ. केदार मोरे, डॉ. योगीता हिरे, डॉ. मंजूषा दराडे, दादा कापडणीस, संजय शेलार, भूषण राणे, संजय भामरे, गोपी गिलबिले व मंडळाचे अध्यक्ष जिभाऊ बच्छाव, शांताराम भामरे आदि मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. कार्यक्रमास विजय पाटील, प्रवीण महाजन, दत्तात्रय संधानशिव, सुभाष बडगुजर, विश्वनाथ नेरकर, दिलीप सावकारे, नाना पवार, गुलाब शेळके, किरण क्षत्रिय, आदि उपस्थित होते.