चास विकास संस्थेच्या अध्यक्षपदी रामनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:30 IST2020-12-13T04:30:48+5:302020-12-13T04:30:48+5:30

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रामनाथ वाळिबा भाबड तर उपाध्यक्षपदी ...

Ramnath as the President of Chas Vikas Sanstha | चास विकास संस्थेच्या अध्यक्षपदी रामनाथ

चास विकास संस्थेच्या अध्यक्षपदी रामनाथ

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रामनाथ वाळिबा भाबड तर उपाध्यक्षपदी मच्छींद्र सखाराम खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष आत्माराम बिडगर व उपाध्यक्ष कांताबाई खैरनार यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून आवर्तन पध्दतीने राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक अधिकारी एस. डी. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. निर्धारित वेळेत अध्यक्षपदासाठी रामनाथ भाबड तर उपाध्यक्ष पदासाठी मच्छींद्र खैरनार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी संचालक संजय यादव खैरनार, बाजार समितीचे उपसभापती संजय वामन खैरनार, मारुती भाबड, भानुदास भाबड, शांताबाई भाबड, दिगंबर भाबड, झुंबरलाल खैरनार, माजी सरपंच बंडूनाना भाबड, चंद्रशेखर खैरनार, नामदेव भाबड, एकनाथ भाबड, विलास खैरनार, उत्तम आंधळे, विश्वास भाबड, संतोष खैरनार, राजेश भाबड आदीसह उपस्थित होते.

----------------

चास विकास संस्थेच्या अध्यक्षपदी रामनाथ भाबड तर उपाध्यक्षपदी मच्छींद्र खैरनार यांची बिनविरोध निवड झाली. त्याप्रसंगी बंडू भाबड, संजय खैरनार, मारुती भाबड, भानुदास भाबड, शांताबाई भाबड आदी. (१२ सिन्नर १)

===Photopath===

121220\12nsk_3_12122020_13.jpg~121220\12nsk_6_12122020_13.jpg

===Caption===

 (१२ नांदगाव १)~(१२ सिन्नर १)

Web Title: Ramnath as the President of Chas Vikas Sanstha