शहरातील मंदिरांमध्ये रामनामाचा जयघोष
By Admin | Updated: March 29, 2015 00:46 IST2015-03-29T00:24:56+5:302015-03-29T00:46:08+5:30
शहरातील मंदिरांमध्ये रामनामाचा जयघोष

शहरातील मंदिरांमध्ये रामनामाचा जयघोष
नाशिक : श्रीराम नवमीनिमित्त शहरातील श्रीराम मंदिरांमध्ये भाविकांची सकाळपासूनच रीघ लागली होती. दुपारी ठीक बाराच्या ठोक्यास मंदिरांमध्ये भाविकांनी भक्तिभावात श्रीरामजन्म साजरा केला. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील पंचवटीतील पुरातन श्री काळाराम मंदिरासह गोरेराम लेनमधील गोराराम मंदिर, जुन्या सिडकोतील राममंदिर, नाव दरवाजा येथील बायकांचा राम, अहल्याराम मंदिर, वाल्मीकनगर येथील मंदिरांत सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे काकड आरतीने कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर श्रीराममूर्तीवर अभिषेक करण्यात आला. दुपारी बारा वाजता पारंपरिक पद्धतीने जन्मोत्सव साजरा करून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)