पर्वणीच्या दिवशी नाशिककरांना रामकुंडावर मज्जाव
By Admin | Updated: July 1, 2015 23:41 IST2015-07-01T23:40:44+5:302015-07-01T23:41:08+5:30
दुपारनंतर बाहेर पडण्याचे आवाहन : सुरक्षिततेच्या उपाययोजना

पर्वणीच्या दिवशी नाशिककरांना रामकुंडावर मज्जाव
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी शाहीस्नानाला असलेले महत्त्व लक्षात घेता, सुमारे एक कोटी भाविक गोदावरीत स्नानासाठी उतरण्याचा अंदाज बांधणाऱ्या प्रशासनाने मात्र या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत नाशिककरांना रामकुंड, गांधीतलाव, रोकडोबा मैदान या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला आहे. वरकरणी पोलीस प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न निघण्याची विनंती केल्याचे दिसत असले तरी, रामकुंड परिसराला कोअर झोनमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना घराबाहेर
पडणेही मुश्कील होणार आहे.