‘रामकृष्ण हरी’ मंत्राने जीवनमर्यादा शिकविल्या
By Admin | Updated: March 26, 2015 23:53 IST2015-03-26T23:18:09+5:302015-03-26T23:53:16+5:30
गुट्टे : वासंतिक नवरात्र महोत्सव

‘रामकृष्ण हरी’ मंत्राने जीवनमर्यादा शिकविल्या
पंचवटी : मूर्तीत दगड नसतो, तर ती साक्षात चैतन्यमूर्ती असते आणि त्यातूनच मानवाला सकारात्मक ऊर्जा मिळते. ‘रामकृष्ण हरी’ या मंत्राने जीवनाच्या मर्यादा शिकविल्या आहेत, असे प्रतिपादन डॉ. तुळशीराम गुट्टे यांनी केले.
श्री काळाराम जन्मोत्सव निमित्ताने काळाराम संस्थानच्या वतीने आयोजित श्री काळाराम वासंतिक नवरात्र महोत्सवात गुट्टे यांनी ‘मानवी मनाचा आरसा’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, प्रभू रामचंद्र ईश्वर आहेत, तसेच ते मानवी युगाचे रूपदेखील आहेत. प्रभू रामाला ज्या सावत्र मातेने वनवासात जायला भाग पाडले होते त्याच सावत्र मातेच्या चरणी वनवासात जाताना प्रभू राम लीन झाले होते. त्यामुळे त्यातूनच त्यांचा सकारात्मक विचार दिसून आला. धार्मिकस्थळ आपली अस्मिता असून, ती जपण्यासाठी सर्वांनी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाणे गरजेचे आहे. प्रभू रामचंद्राला समजून घेण्यासाठी त्याची नित्यनियमाने साधना करायला पाहिजे. जीवन जगताना मानवाने सकारात्मक विचार ठेवला तर तो जीवनात यशस्वी होतो. सकारात्मक विचार हे साधना केल्यानेच
तयार होतात, असेही ते शेवटी
म्हणाले. (वार्ताहर)