रामदास कोकरे यांना ‘वसुंधरा सन्मान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:20 IST2017-08-23T23:43:58+5:302017-08-24T00:20:53+5:30
घनकचºयाचे अचूक व्यवस्थापन करून प्लॅस्टिकमुक्तीचा ध्यास घेऊन रत्नागिरीमधील दापोली अन् सिंधुदुर्गच्या वेंगुर्लामध्ये प्रेरणादायी पर्यावरणपूरक काम करणारे नगरपालिकेचे अधिकारी रामदास कोकरे यांना वसुंधरा सन्मान, तर नाशिकच्या निसर्ग मित्रमंडळाला वसुंधरामित्र पुरस्काराने गौरविण्यात आले.

रामदास कोकरे यांना ‘वसुंधरा सन्मान’
नाशिक : घनकचºयाचे अचूक व्यवस्थापन करून प्लॅस्टिकमुक्तीचा ध्यास घेऊन रत्नागिरीमधील दापोली अन् सिंधुदुर्गच्या वेंगुर्लामध्ये प्रेरणादायी पर्यावरणपूरक काम करणारे नगरपालिकेचे अधिकारी रामदास कोकरे यांना वसुंधरा सन्मान, तर नाशिकच्या निसर्ग मित्रमंडळाला वसुंधरामित्र पुरस्काराने गौरविण्यात आले.
निमित्त होते, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवाचे. या महोत्सवांतर्गत वसुंधरा संवर्धनासाठी उपयुक्त अशा पर्यावरणपूरक भरीव योगदान देणाºया व्यक्ती, संस्था यांना वसुंधरा सन्मान आणि वसुंधरामित्र या पुरस्काराने दरवर्षी गौरविण्यात येते. हा पुरस्कार वितरण सोहळा गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकमधील विशाखा सभागृहात उत्साहात पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून दिग्दर्शक संदीप सावंत, किर्लोस्करचे व्यवस्थापक जगदीश गदगे, महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव, रामदास कोकरे, विजय सांबरे आदी मान्यवर उपस्थित होते. इंदिरानगर भागात काही मित्रांनी एकत्र येत स्थापन केलेला अनौपचारिक गट अर्थात निसर्ग मित्रमंडळाने पर्यावरणपूरक विविध उपक्रम हाती घेत यशस्वीपणे राबविले.
...म्हणून गावाची नदी वाचवा
आपल्या गावातून वाहणाºया नदीचे संवर्धन न करता शहराच्या किंवा देशाच्या शाश्वत विकासाची कल्पना करणे हे अशक्य आहे. नद्या वाचवायच्या असतील तर काय करावे लागेल ते ‘नदी वाहते’ या सिनेमातून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे चित्रपटाचे निर्माते संदीप सावंत यांनी यावेळी सांगितले.