रमजान पर्वाचे वेळापत्रक निश्चित

By Admin | Updated: June 26, 2014 01:16 IST2014-06-26T01:09:35+5:302014-06-26T01:16:45+5:30

रमजान पर्वाचे वेळापत्रक निश्चित

Ramadan Regular Schedule | रमजान पर्वाचे वेळापत्रक निश्चित

रमजान पर्वाचे वेळापत्रक निश्चित

 

जुने नाशिक : गेल्या ‘शब-ए-बरात’च्या पवित्र रात्रीमध्ये धर्मगुरूं च्या बैठकीत शाही मशिदीत रमजान पर्वाच्या ‘रोजा सहेरी-इफ्तार’बरोबर अजानचेदेखील संपूर्ण महिन्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आल्याचे खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
येत्या शनिवारी चालू उर्दू महिन्याची २९ तारीख असल्यामुळे आगामी रमजान महिन्याचे चंद्रदर्शन घडण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शाही मशिदीत स्थानिक चांद समितीच्या वतीने धर्मगुरूंची बैठक बोलविण्यात आली आहे. मुस्लीम बांधवांनी शनिवारी चंद्रदर्शन घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा, तसेच चंद्रदर्शन झाल्यास तातडीने शाही मशिदीत समक्ष उपस्थित राहून ग्वाही द्यावी, असे आवाहन सय्यद मीर मुख्तार यांनी केले आहे. गेल्या वर्षी शहरात छापण्यात आलेल्या रमजानच्या वेळापत्रकामध्ये अनवधानाने रोजा सोडण्याची अर्थात इफ्तारच्या वेळांमध्ये त्रुटी आढळून आल्याने समाजबांधवांचा गोंधळ होत होता. यावर्षी कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नये, यासाठी धर्मगुरूंनी एकत्र येऊन सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळांचा अभ्यास करून रमजानचे वेळापत्रक निश्चित केले आहे. या वेळापत्रकाच्या एकूण दोन हजार प्रती शहरासह जिल्ह्यातील विविध मशिदींमध्ये तसेच प्रिंटिंग प्रेसचालकांकडे पोहचविण्यात आल्याचे खतिब यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Ramadan Regular Schedule