राम तेरी बाणगंगा मैली हो गयी़
By Admin | Updated: June 3, 2014 00:52 IST2014-06-03T00:28:23+5:302014-06-03T00:52:54+5:30
ओझर : ओझर गावाचे भूषण असलेली व पवित्र धार्मिक विधी ज्या नदीच्या तीरावर होतात त्या बाणगंगेला गटारीचे स्वरूप आले आहे

राम तेरी बाणगंगा मैली हो गयी़
ओझर : ओझर गावाचे भूषण असलेली व पवित्र धार्मिक विधी ज्या नदीच्या तीरावर होतात त्या बाणगंगेला गटारीचे स्वरूप आले आहे. या बाणगंगेचे संगोपन करणे काळाची गरज बनू पाहत आहे़ ओझर गावाजवळून वाहत जाणारी बाणगंगा ही नदी मुंबई-आग्रा महामार्गालगत जाते़ याच नदीतीरावर विविध धार्मिक मंदिरे, स्मशानभूमी, दशक्रिया विधी शेड, आठवडे बाजार असून, नदीतील दुर्गंधीचा सामना त्यांना करावा लागत आहे़ नदीच्या पात्रात घाण, कचरा, कुजलेल्या वस्तू, मेलेली जनावरे, पालापाचोळा यांची भर पडून सर्रासपणे प्रातर्विधी करण्यात येत असून, नदीबरोबरच परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे़ मंगळवारी येथे आठवडे बाजार भरतो, तसेच मंदिरात येणारी भाविकांची गर्दी, दशक्रिया विधी व अंत्यविधीसाठी येणार्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे़ यासंदर्भात प्रशासनाने तत्काळ कारवाई करून या पवित्र नदीला वाचवावे, अशी मागणी करण्यात येत आहे़(वार्ताहर)