रामरथ मिरवणूक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 22:44 IST2016-04-18T22:43:02+5:302016-04-18T22:44:58+5:30

रामरथ मिरवणूक उत्साहात

Ram Rath captivates with zeal | रामरथ मिरवणूक उत्साहात

रामरथ मिरवणूक उत्साहात

सिन्नर : येथील पारंपरिक रामरथ मिरवणूक रविवारी सायंकाळी उत्साहात पार पडली. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला होता.
तानाजी चौकातील प्रसिद्ध पुरातन श्रीराम मंदिराच्या वतीने दरवर्षी रामनवमीनंतर येणाऱ्या कामदा एकादशीस शहरातून पारंपरिक रामरथाची मिरवणूक काढण्यात येते. वाजे यांच्या हस्ते रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. याप्रसंगी अरुण देशमुख, समीर तहसीलदार, भाऊसाहेब कोकाटे, किशोर लोखंडे, संजय मोरे, शिवाजी देशमुख, पोपट कोकाटे, रवींद्र काकड, राहुल बलक, माणिकराव रायजादे, रामरथ उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष संदीप लोखंडे, खजिनदार किरण नळवाडे, व्यवस्थापक सागर गड्डम आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात ठिकठिकाणी महिलांनी रथाचे पूजन केले, तर नागरिकांकडून रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. रथ ओढण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली
होती.
तानाजी चौकातून निघालेली मिरवणूक गावठा, बसस्टॅँड, नेहरू चौक, खडकपुरा, गणेश पेठ, भिकुसा कॉर्नर, लाल चौक, नाशिक वेस, गंगा वेस, सोनार गल्ली, खडकपुरा, शिवाजी चौक, वावी वेसमार्गे तानाजी चौकात पोहोचली. तानाजी चौकात मिरवणुकीचा समोराप करण्यात आला. शहरात रथाचे पूजन व दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. (वार्ताहर)

Web Title: Ram Rath captivates with zeal