शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी म्हणाले, ‘शास्त्रीजी अष्टोत्तर शत रामनाम करना ही है’; नाशिकच्या शांतारामशास्त्री भानोसे यांच्या स्वरात प्राणप्रतिष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 08:04 IST

या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणात पूजाविधीतील श्लोक उच्चारण माइकवरून करताना दिसल्याने नाशिककरांचा ऊरदेखील अभिमानाने भरून आला. 

- धनंजय रिसोडकरनाशिक : अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना पूजाविधी सांगणाऱ्या प्रमुख ५ पुरोहितांमध्ये नाशिकच्या वेदशास्त्रसंपन्न पुरोहित शांतारामशास्त्री भानोसे यांचा समावेश होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भानोसे यांच्याकडे बघून ‘शास्त्रीजी अष्टोत्तर शत रामनाम करना ही है’ असे सांगत पूजाविधीतील सर्व बाबींची साग्रसंगीत पूर्तता केल्याचे वेशासं भानोसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

संपूर्ण पूजाविधीमध्ये प्रभू रामचंद्रांची १०८ नावे अर्थात नामावली घेऊन चांदीची पुष्पे रामलल्लांच्या चरणाशी अर्पण करण्याचा विधी आपल्याला करायचाच आहे, असे स्वत: पंतप्रधानांनीच सांगितले. त्यामुळे तो सर्व विधी करूनच प्राणप्रतिष्ठा पूजनाची सांगता झाली.  

देशातील २१ गुरुजींनाच संधीयजुर्वेदीय परंपरेतील तज्ज्ञांना अयोध्येत बोलावण्याचा निर्णय प्रधान आचार्य काशीचे आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित आणि गणेश्वरशास्त्री द्रविड यांच्या मार्गदर्शनात झाला. त्यानुसारच नाशिकच्या शांतारामशास्त्री भानोसे यांना पाचारण केले. सोहळ्यात देशभरातील २१ गुरुजींना ही संधी लाभली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात थेट गर्भगृहात पंतप्रधानांनजीक बसून पूजाविधीचा प्रयोग चालवण्याची संधी वेशासं भानोसे यांना लाभली. या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणात पूजाविधीतील श्लोक उच्चारण माइकवरून करताना दिसल्याने नाशिककरांचा ऊरदेखील अभिमानाने भरून आला. 

अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी गर्भगृहात असलेल्या ५ प्रमुख पुरोहितांमध्ये अर्थात पंच महापंडितांमध्ये समावेश होण्याचा आनंद शब्दातीत असून, जीवनाचे सार्थक झाल्याची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पूजा विधीतील शोडषोपचाराचे श्लोकदेखील पाठ असल्याचे बघून विशेष वाटले.      - वेशासं. शांताराम शास्त्री भानोसे

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNashikनाशिक