मनमाडला रामनवमी उत्साहात

By Admin | Updated: April 6, 2017 00:47 IST2017-04-06T00:47:34+5:302017-04-06T00:47:51+5:30

मनमाड : शहर व परिसरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

Ram Manavami to Manmad | मनमाडला रामनवमी उत्साहात

मनमाडला रामनवमी उत्साहात

 मनमाड : शहर व परिसरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
येथील आठवडे बाजारातील श्रीराम मंदिरात सकाळी कैलास भाबड यांच्या हस्ते सपत्नीक महाअभिषेक, पूजा संपन्न झाली. वेशीतील मारु ती मंदिर मंडळाच्या वतीने सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी १२ वाजता रामजन्माचे भजन होऊन श्रीराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाले. ओम मित्रमंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समितीचे हे ३१ वे वर्ष होते. यंदाही भव्य श्रीराम रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संतोष बळीद, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश गाडगीळ, रमाकांत मंत्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रथयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
या उत्सवाचे आयोजन समितीचे अध्यक्ष संतोष बळीद, ओम मित्रमंडळाचे नितीन पांडे, नाना शिंदे, किशोर गुजराथी, कृष्णा शिंपी, नीळकंठ त्रिभुवन, किशोर आव्हाड, गोविंद रसाळ, रमेश गवळी, सुभाष माळवतकर, सुनील सानप, रोहित कुलकर्णी, प्रज्ञेश खांदाट, नारायण पवार आदिंनी केले. मनमाड नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनी, तर व्यापारी महासंघाच्या वतीने अध्यक्ष राजाभाऊ पारीक, मनोज जंगम, कुलदीपसिंग चोटमुरादी, प्रशांत चंद्रात्रे, अनिल गुंदेचा यांनी मिरवणुकीचे स्वागत
केले. यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, प्रवीण नाईक, योगेश पाटील, सुनील पाटील, सुभाष नहार, राजाभाऊ पवार, सुनील गवांदे, तुषार गोयल, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, नगरसेवक प्रमोद पाचोरकर, कैलास गवळी, पप्पू परब, पंकज खताळ, उमाकांत राय, अंकुश जोशी, प्रवीण सूर्यवंशी, एकनाथ बोडखे, नितीन पाटील, मधुकर खताळ, नरेश फुलवाणी यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर).

Web Title: Ram Manavami to Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.