Rally for saintly nocturnal sex | संत निरंकारी समागम साठी रॅली

  घोटी शहरातून काढण्यात आलेली संत निरंकारी मंडळाची रॅली.  

ठळक मुद्देघोटी शाखा : बोरगड येथे होणाऱ्या कार्यक्रमाची जनजागृती


संत निरंकारी मंडळाचे वतीने पुढिल आठवड्यात नाशिक येथे होणा-या दिव्य संत निरंकारी समागमाच्या जनजागृती साठी घोटी शाखेअंतर्गत येणाº्या गावोगावच्या संत व भाविकांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
या पुर्वी मुंबई येथे संत समागम होते असे. परंतु दिवसेंदिवस लाखोंची गर्दी वाढत चालल्याने चुनाभट्टी (चेंबुर) . कळवा(ठाणे) खारघर (नवी मुंबई) येथील जागा कमी पडल्याने कार्यक्रम नाशिक येथे घेण्यत येणार आहे.
ईगतपुरी तालुक्यातील घोटी. ईगतपुरी व शिरेवाडी या तीन शाखांपैकी घोटी शाखेतील मोगरेचे प्रबंधक दत्तू नाडेकर, खडकवाडीचे गुलाब कडू. घोटीचे शिवाजी बारगजे, सोमजचे कृष्णा कुंदे, गरु डेश्वरचे तानाजी वारघडे, वैतरणाचे वाळू पारधी, गांगडवाडीचे सोनू गांगड, उभाडेवाडीचे गोरख गांगड, उभाडेचे किसन उंबरे, उंबरकोणचे सुकदेव सारूक्ते, बळवंतवाडीचे लक्ष्मण लोटे, भरवजचे शशिकांत मेमाणे. दरेवाडीचे बाळू गावंडा,काळूस्तेचे शिवराम घारे.खैरगावचे सोमनाथ फोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व दिलीप तोकडे, माजी उपसरपंच संतोष दगडे, राजू लंगडे, गजानन दुरगुड, ज्ञानेश्वर कडू, व शिवमल्हार मित्र मंडळ यांच्या सहकार्याने ही रॅली निघाली. पारंपरिक पोशाख.घातलेले छोटे संत,व न्यू इंग्लिश स्कूल काळूस्तेचे लेझीम पथकाच्या तालात व जय घोष करून जनजागृती करण्यात आली. सुधाकर दुरगुडे,पंडित डहाळे, राम भटाटे,,दशरथ उंबरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत सर्वतिर्थ टाकेद, घोटी व परीसरातील गावोगावच्या सत्संगातील भाविक सहभागी झाले होते.

Web Title:  Rally for saintly nocturnal sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.