पुणेगाव-डोंगरगाव कालव्यासाठी रॅली
By Admin | Updated: August 19, 2016 00:12 IST2016-08-19T00:12:38+5:302016-08-19T00:12:38+5:30
पुणेगाव-डोंगरगाव कालव्यासाठी रॅली

पुणेगाव-डोंगरगाव कालव्यासाठी रॅली
येवला : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याचा उपक्रमयेवला : पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या तालुक्यातील बाळापुर पर्यत ४२ किमी आतर असलेला कालव्याची पूरपाण्याने चाचणी करावी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व कालव्याची सद्यस्थिती पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी बाळापूर ते दरसवाडी धरणापर्यंत कालव्याच्या भरावावरु न दुचाकी रॅली काढली होती. या रॅलीत येवला व चांदवड येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
दरसवाडी धरण ते येवला तालुक्यातील बाळापूर कालवा सुस्थितीत असून कमी पाण्यामध्ये कालव्याची चाचणी सहज शक्य आहे. कालव्याच्या कडेने असलेल्या विहिरी, तळी, साठवण तलाव पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. कुठलाही वहनव्यय या चाचणीच्या वेळी होणार नसल्याने या कालव्याची चाचणी घ्यावी, अशी मागणी येवला तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांची व संघटनांची आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष मोहन शेलार, जलअभ्यासक भागवत सोनवणे यांचेसह लाभक्षेत्रातील शेतकरी यांनी केली आहे. खडकओझर येथील केंद्राई बंधाऱ्यातुन सोडलेल्या पाण्यामुळे दरसवाडी बंधारा भरत आलेला आहे. दरसवाडी बंधाऱ्यामध्ये इतका मोठा पाणी साठा गेल्या कित्येक वर्षात प्रथमच होत आहे. गरज नसतांना केंद्राई धरणातुन निफाड तालुक्यात जाणारे पाणी दरसवाडी बंधाऱ्यात वळवणे गरजेचे आहे. आमदार डॉ. राहूल आहेर यांनी येवला तालुक्याकडे दुर्लक्ष करु नये व येवला तालुक्यातील किमान बाळापूर पर्यंत कालव्याच्या चाचणीसाठी आग्रह धरावा. या पाशर््वभूमीवर यंदाचा पावसाळा कालव्याच्या चाचणीसाठी अनुकूल असून कालव्याची घ्यावी, अशी मागणी होत आहे. यासाठी भाजप- शिवसेना यांनीही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे.
दुचाकी रॅलीमध्ये मोहन शेलार, भागवत सोनवणे, भगवान ठोंबरे, रवीराज जाधव, किरण ठाकरे, भागीनाथ कदम, प्रल्हाद शिंदे, समाधान शिंदे, नामदेव कदम, गोपीनाथ सोनवणे, कमलाकर कदम, सुभाष कदम, नारायण गुंजाळ, रमेश निकम, खंडू आहिरे, विठ्ठल कदम, रघुनाथ शिंदे, विशाल ढोमसे, जनार्दन चोळके, पुंडलिक कोटकर आदींसह येवला तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.
रॅली कॅनॉलच्या कडेने जाताना चांदवड तालुक्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले. (वार्ताहर)