देवपूर विद्यालयाचे रक्षाबंधन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:09 IST2017-08-06T23:45:22+5:302017-08-07T00:09:33+5:30
सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील एस. जी. कनिष्ठ महाविद्यालय व देवपूर विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला.

देवपूर विद्यालयाचे रक्षाबंधन उत्साहात
पाथरे : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील एस. जी. कनिष्ठ महाविद्यालय व देवपूर विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनास भारतात धार्मिक व सामाजिक महत्त्व आहे. विद्यालयात हा सण विविध कार्यक्रमाने पार पडला. यावेळी उपस्थित असलेले देवपूरचे सुपुत्र व भारतील सैन्य दलातील जवान विलास गडाख यांना विद्यार्थिनींनी औक्षण करून राख्या बांधल्या. प्राचार्य विद्या साळुंखे व सुमन मुंगसे यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य विद्या साळुंखे, सुमन मुंगसे, वैशाली पाटील, ताराबाई व्यवहारे, सुनील पगार, भीमराव अढांगळे, बाळासाहेब कुमावत, प्रमोद बधान, नानासाहेब खुळे, श्रीहरी सैंद्रे, राजेश अहेर, एन. डी. एस. टी. चे संचालक दत्तात्रय आदिक, सतीश गायकवाड आदी प्रयत्नशील होते. बी. डी. अढांगळे यांनी सूत्रसंचालन केले.