प्रिन्स मित्रमंडळाचे अंध मुलांसोबत रक्षाबंधन
By Admin | Updated: August 18, 2016 23:34 IST2016-08-18T23:34:12+5:302016-08-18T23:34:12+5:30
प्रिन्स मित्रमंडळाचे अंध मुलांसोबत रक्षाबंधन

प्रिन्स मित्रमंडळाचे अंध मुलांसोबत रक्षाबंधन
भगूर : नाशिक-पुणे रोड येथे समाजकल्याण विभागाच्या शासकीय अंधशाळेत राखीपौर्णिमे-निमित्त प्रिन्स मित्रमंडळाच्या वतीने अंध मुलांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
गेल्या २६ वर्षांपासून प्रिन्स मित्रमंडळाने रक्षाबंधन सण साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. समाजकल्याण विभागाच्या शासकीय अंध शाळेतील ६० छोट्या विद्यार्थ्यांना राखी बांधून खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी नगरसेवक सूर्यकांत लवटे, भगवान कारडा, राजू लवटे, सलीम इनामदार, किशोर कारडा, पी. डी. जाधव, वासू कारडा, अनिल पमनानी आदि उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्ष कन्हैया पमनानी व आभार किशोर जाधव यांनी मानले. यावेळी अधीक्षक अनिल पाटील, शिक्षक सुरेश भामरे, महेश बोरसे, पोपट पवार, यमुनाबाई भोसले, हर्षल टेंभुर्नीकर, हौसाबाई भालेराव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)