शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

राजापूरला दुष्काळाने उभा कांदा करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:01 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूरच्या भाळी दोन वर्षाआड दुष्काळ लिहिलेला आहे. यंदा या दुष्काळाने तर सीमा ओलडल्या असून, पैसे, पाणी व अन्नधान्य अशा सर्व पातळीवर दुष्काळ छळू लागला आहे. मका, कपाशी, कांदे निघून गेल्याने शेती ओस पडली आहे.

ठळक मुद्दे येथील शेती पावसाच्या भरवशावर असताना शेतकऱ्यांनी पहिल्या हलक्या पावसावरच कपाशी पाठोपाठ मकाची लागवड केली. पण ऐन पीकवाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने जोमाने तीन-साडेतीन फुटापर्यत उंच वाढणारी कपाशी दीड-दोन फुटावरच अडकली, तर मकाचा शेंडा सहा फुटांवर न पोहोचता

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूरच्या भाळी दोन वर्षाआड दुष्काळ लिहिलेला आहे. यंदा या दुष्काळाने तर सीमा ओलडल्या असून, पैसे, पाणी व अन्नधान्य अशा सर्व पातळीवर दुष्काळ छळू लागला आहे. मका, कपाशी, कांदे निघून गेल्याने शेती ओस पडली आहे.   झाडाची भर न झाल्याने कापसाला दरवर्षी ५० ते ९० पर्यंत बोंडे लागून एकरी ८ ते १२ क्विंटल उत्पन्न निघते तेथे यावर्षी १० ते २० बोंडे येऊन १ ते ३ क्विंटल उत्पन्न निघाले आहे. मकाचे एकरी २५ ते ३२ क्विंटलपर्यंत दरवर्षी उत्पन्न हाती लागते. यावर्षी उत्पन्न ३ ते ५ क्विंटलपर्यंत घटून फक्त चाराच हाती आला आहे. पुढे पाऊस पडेल या भरवशावर लाल कांद्याच्या लागवडीचा जुगार खेळत पुन्हा एकदा नशीब आजमवण्याच्या प्रयत्न पाणीच नसल्याने फसला अन् उभा कांदा करपला.आज हजार एकरांवर जमीन पिकांअभावी ओसाड पडली असून, जिकडे पाहावे तिकडे मोकळे रानमाळ दिसत आहे. अनेकांनी बैल, ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करून ठेवल्याने ढेकळांशिवाय काहीही नजरेत पडत नाही. परिसरातील गाव व वाड्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तेव्हा रब्बी हंगामाचा विषयच नाही.आता फक्त जून उजाडावा आणि धोधो पाऊस पडावा हीच आस नव्या हंगामासाठी राजापूरकरांना लागून आहे.-बंधारे कोरडे, तर ७० टक्के विहिरी पावसाळ्यातही कोरड्या होत्या.-पावसाळ्यात फक्त दोन सर्वसाधारण, तर सुमारे १८-२०टक्के रब्बी पेरणी बोटावर मोजण्या इतकीच झाली.-अनेक शेततळे वर्षभर रिकामे होते, तर आता ९७ टक्के तळे कोरडेठाक पडले आहेत.उन्हाच्या तीव्रतेने शेततळ्यांचे कागद खराब होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राजापूर हे येवला तालुक्याच्या पूर्वेकडील उंचावर असल्याने येथे दरवर्षी पाऊस पडूनही उत्पन्न निघते असे नाही. राजापूरकरांच्या नशिबी दुष्काळ हा दरवर्षी पाचवीलाच पूजलेला आहे. हरणे, मोर व अन्य वन्यजीव अन्न-पाण्याच्या शोधात गावाकडे येत आहे. दुष्काळसदृश स्थितीचा सामना पशुपक्ष्यांनाही करावा लागत आहे. डिसेंबरमध्येच अशी स्थिती असून,पुढील सहा ते सात महिने कसे काढावे या विचाराने शेतकरी चिंतित आहे.==राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने निसर्गाच्या भरवशावर येथील शेतकरी शेती करतात. हे गाव उंचावर असल्याने येथे कुठल्याही सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे शेतकरी व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे-काशीनाथ चव्हाण, शेतकरी, राजापूर