राजदेरवाडीला पानी फाउण्डेशनचा प्रथम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 04:52 PM2018-08-13T16:52:51+5:302018-08-13T16:55:03+5:30

चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीस पानी फाउण्डेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाचा दहा लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. तालुक्यातील रेडगाव खुर्द द्वितीय, तर मालसाणे ग्रामपंचायतीस तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

 Rajendrawadi Water Foundation's first prize | राजदेरवाडीला पानी फाउण्डेशनचा प्रथम पुरस्कार

राजदेरवाडीला पानी फाउण्डेशनचा प्रथम पुरस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देराजदेरवाडी ग्रामपंचायतीस पानी फाऊंडेशनकडून दहा लाख तर मुख्यमंत्र्याकडून पाच लाख असे एकूण १५ लाखांचे परितोषीक जाहीर करण्यात आले तर दुसरे व आणि तिसरे स्थान पटकाविणाºंया रेडगावखुर्द व मालसाणे ग्रामपंचायतीस पाणी फाऊंडेशनचे पाच लाख व मुख्यमंत्र्याचे तीन लाख रु


चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीस पानी फाउण्डेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाचा दहा लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. तालुक्यातील रेडगाव खुर्द द्वितीय, तर मालसाणे ग्रामपंचायतीस तृतीय पुरस्कार मिळाला आहे.
सदर स्पर्धेचा निकाल रविवार दि. १२ रोजी पुणे येथील बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सत्यमेव जयते वॉटर कपचे प्रमुख अमीर खान, किरण राव, जलसंधारणमंत्री राम शिंदे, प्रधान सचिव प्रवीण परदेशी, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथा, पानी फाउण्डेशनचे जनक सत्यजित भटकळ, अविनाश पोळ, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, हिवरेबाजारचे पोपटराव पवार आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सदरचा पुरस्कार उपसरपंच मनोज शिंदे, ग्रामसेवक भागवत सोनवणे यांनी स्वीकारला. यावेळी चांदवड पंचायत समितीचे सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, तहसीलदार शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, राजदेरवाडीच्या सरपंच सखुबाई माळी , कैलास शिंदे,नंदराज जाधव, दीपक जाधव, जगन यशवंते, जगन जाधव ,जगन पवार, बाळु जाधव आदि उपस्थित होते. राजदेरवाडी ग्रामपंचायतीस पानी फाऊंडेशनकडून दहा लाख तर मुख्यमंत्र्याकडून पाच लाख असे एकूण १५ लाखांचे परितोषीक जाहीर करण्यात आले तर दुसरे व आणि तिसरे स्थान पटकाविणाºंया रेडगावखुर्द व मालसाणे ग्रामपंचायतीस पाणी फाऊंडेशनचे पाच लाख व मुख्यमंत्र्याचे तीन लाख रुपये बक्षिस जाहीर केले.
 

Web Title:  Rajendrawadi Water Foundation's first prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.