निफाड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र राठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:43+5:302021-09-24T04:16:43+5:30
निफाडचे सहायक निबंधक रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी राजेंद्र चंपालाल राठी यांचा आणि उपाध्यक्षपदासाठी वनमाला सोहनलाल ...

निफाड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र राठी
निफाडचे सहायक निबंधक रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी राजेंद्र चंपालाल राठी यांचा आणि उपाध्यक्षपदासाठी वनमाला सोहनलाल सुराणा यांचा एकमेव अर्ज आल्याने या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीला बँकेचे संचालक नंदलाल बाफना, नंदलाल चोरडिया, विजय बोरा, परमानंद गोसावी, केशरचंद रुणवाळ, पांडुरंग बुटे, डॉ. देवील सोनवणे, प्रवीण कराड, आनंद दायमा, कृष्णा नागरे, सचिन गिते, विलास निरभवणे तज्ज्ञ संचालक रविकुमार राठी, प्रवीण ठाकरे स्वीकृत संचालक संपत डुंबरे, शिवाजी ढेपले आदी उपस्थित होते.
त्यानंतर अनिल कुंदे, नंदलाल चोरडिया, शिवाजी ढेपले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन सुराणा आदींची भाषणे झाली नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र राठी यांनी सत्काराला उत्तर दिले
याप्रसंगी वि. दा. व्यवहारे, राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, रतन पाटील वडघुले, प्रकाश सुराणा, शंकर वाघ, मनोहर सांगळे, प्रमोद जडे, बापूसाहेब कुंदे, विक्रम रंधवे, भाऊसाहेब कापसे, विश्वास कराड, सुनील भुतडा आदी उपस्थित होते. (२३ निफाड)
230921\23nsk_39_23092021_13.jpg
निफाड अर्बन बँके अध्यक्षपदी राजेंद्र राठी.