लखमापूर : दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन,व्हाईस चेअरमन, मानद सचिव पदांच्या निवडीची सभा सहाय्यक निबंधक कार्यालय दिंडोरी येथे संपन्न झाली.सदर सभेत चेअरमनपदी राजेंद्र गांगुर्डे, व्हाईस चेअरमनपदी विलास पाटील पेलमहाले, तर मानद सचिवपदी शरद डगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय गायकवाड यांनी काम पाहिले.यावेळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष व संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन वडजे यांनी सत्कार केले.नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र गांगुर्डे यांनी सभासदांचे हित जोपासुन संस्थेच्या प्रगतीसाठी येत्या काळात नियोजन करण्यात येईल असे सांगितले.याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक दत्तात्रय चौगुले, श्रावण भोये, नियाज शेख, मधुकर आहेर, बाळासाहेब बर्डे, प्रवीण वराडे, किरण शिंदे, शंकर ठाकरे, छाया पाटील, ज्योती तुंगार आदी सह सभासद एकनाथ पाटील, कल्याण कुडके, बाळासाहेब जाधव, कचरू लिलके, व्यवस्थापक राकेश थेटे, कार्यालय सहाय्यक रूषिकेश खांदवे आदी उपस्थित होते.
दिंडोरी तालुका शिक्षक बॅँक चेअरमनपदी राजेन्द्र गांगुर्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 14:42 IST
लखमापूर : दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन,व्हाईस चेअरमन, मानद सचिव पदांच्या निवडीची सभा सहाय्यक निबंधक कार्यालय दिंडोरी येथे संपन्न झाली.
दिंडोरी तालुका शिक्षक बॅँक चेअरमनपदी राजेन्द्र गांगुर्डे
ठळक मुद्दे विलास पेलमहाले यांची व्हाईस चेअरमनपदी निवड