आयुक्तांच्या रडारवर कथित ‘राजे-महाराजे’

By Admin | Updated: May 25, 2016 00:07 IST2016-05-25T00:07:04+5:302016-05-25T00:07:53+5:30

अनधिकृत बांधकाम : बड्यांवरही कारवाईचे दिले संकेत

The 'Raje-Maharaj' on the Radar of the Commissioner | आयुक्तांच्या रडारवर कथित ‘राजे-महाराजे’

आयुक्तांच्या रडारवर कथित ‘राजे-महाराजे’

नाशिक : कॉलेजरोडवरील सन्मित्र सोसायटीच्या अनधिकृत तीन मजल्यांवर चालविलेला हातोडा आणि त्यापाठोपाठ नाशिकरोड येथील चव्हाण मळ्यातील ११४ झोपड्यांवर फिरविलेला बुलडोझर या मोठ्या मोहिमेनंतर आयुक्तांनी कथित ‘राजे-महाराजे’ यांची अनधिकृत बांधकामेही आपल्या रडारवर असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत बड्या लोकांच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा निश्चित मानला जात आहे. महापालिकेकडे प्राप्त तक्रारींवर अतिक्रमण विभागाने कार्यवाही सुरू केली असून, अनधिकृत बांधकामे हटविली जात आहेत. सोमवारी कॉलेजरोडवरील सन्मित्र सोसायटीच्या अनधिकृत तीन मजल्यांवर हातोडा चालवित धडक कारवाई केली. मंगळवारी नाशिकरोड येथील पंचशिल को. आॅप. सोसायटीच्या भूखंडावरील अनधिकृतपणे १४ झोपड्या हटविल्या. शिवाय एका पक्षाचे संपर्क कार्यालयही तोडून टाकले.

Web Title: The 'Raje-Maharaj' on the Radar of the Commissioner