राजदेरवाडी ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा जिल्हास्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 21:27 IST2018-08-16T21:26:51+5:302018-08-16T21:27:18+5:30

चांदवड - संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१७-१८ या वर्षी जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट कामिगरी बजावल्याबदल तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत तीन लाख रूपयांचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

 Rajdevwadi Gram Panchayats Saint Gadgebaba District Level Award | राजदेरवाडी ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा जिल्हास्तरीय पुरस्कार

राजदेरवाडी ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा जिल्हास्तरीय पुरस्कार

ठळक मुद्देनाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात पालक मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सरपंच सखुबाई माळी, उपसरपंच मनोज शिंदे , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक भागवत सोनवणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


चांदवड - संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१७-१८ या वर्षी जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट कामिगरी बजावल्याबदल तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत तीन लाख रूपयांचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात पालक मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सरपंच सखुबाई माळी, उपसरपंच मनोज शिंदे , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक भागवत सोनवणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल, पोलीस अधीक्षक प्रवीण दराडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ .शीतल सांगळे, उपायुक्त प्रतिभा संगमनेरे,उपायुक्त वर्षा पडोळ, आदी उपस्थित होते.
 

Web Title:  Rajdevwadi Gram Panchayats Saint Gadgebaba District Level Award