राजस्थानी संघटनेचा स्नेहमेळावा
By Admin | Updated: November 19, 2015 22:51 IST2015-11-19T22:50:53+5:302015-11-19T22:51:46+5:30
राजस्थानी संघटनेचा स्नेहमेळावा

राजस्थानी संघटनेचा स्नेहमेळावा
सातपूर : राजस्थानमधून सातपूर परिसरात उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या राजस्थानी बांधवांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. जैन, माहेश्वरी, ब्राह्मण, सेन, अग्रवाल अशा विविध पोटजाती यानिमित्ताने प्रथमच एकत्र आल्या असून, त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले
होते.
दिवाळीचे औचित्य साधून सौभाव्य लॉन्स येथे या कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात पारंपरिक वेशभूषा करून बच्चेकंपनीसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. बंडू देशपांडे आणि गायकवाड यांच्या गायन पथकाने कार्यक्रमांची रंगत वाढविली.
राजस्थानी समाजबांधवांनी संघटना वाढविण्यासाठी एकत्र येऊन अशा प्रकारच्या विविध स्नेहसोहळ्याचे आयोजन केले पाहिजे असे यावेळी रामनाथ मुंदडा यांनी सांगितले. याप्रसंगी अमोलकचंद भंडारी, श्यामराव लाहोटी, जगदीश भट्टड, चंद्रकांत निर्वाण, सतीश उपाध्ये, किशोर मुंदडा, आदि मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते आरती, पूजन करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. याप्रसंगी राजेश धूत, प्रमोद लोहाडे, दिलीप दुगड, अशोक जाजू, रमेश ठोके, लोकेश कटारिया, बाळासाहेब सारडा, नीलेश निर्वाण, दिलीप कटारिया, दीपक निर्वाण, राजेंद्र तंवर, योगेश मुंदडा आदिंसह समाजबांधव सहकुटंब उपस्थित होते. राजस्थान संघटनेचे अध्यक्ष किरण बद्दर यांनी स्वागत केले. रवींद्र केडिया यांनी प्रास्ताविक केले.