शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

आजपासून धावणार राजधानी एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:17 PM

मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दिल्ली निजामुद्दीनपर्यंत आठवड्यातून दोन दिवस राजधानी एक्स्प्रेस येत्या शनिवारपासून धावण्यास सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी नाशिकरोड रेल्वेस्थानकाला दिलेल्या कोट्यापैकी ८० टक्के बुकिंग झाली आहे.

ठळक मुद्देनाशिकरोडला बुकिंगला प्रतिसाद दिल्लीसाठी प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध

नाशिकरोड : मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दिल्ली निजामुद्दीनपर्यंत आठवड्यातून दोन दिवस राजधानी एक्स्प्रेस येत्या शनिवारपासून धावण्यास सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी नाशिकरोड रेल्वेस्थानकाला दिलेल्या कोट्यापैकी ८० टक्के बुकिंग झाली आहे.आठवड्यातून प्रत्येक बुधवारी व शनिवारी १५ कोचची मुंबई सीएसटी ते निजामुद्दीन (रेल्वे गाडी क्र. २२२२१) व निजामुद्दीनहून मुंबई सीएसटीपर्यंत (रेल्वे गाडी क्र. २२२२२) दर गुरुवारी व रविवारी राजधानी एक्स्प्रेस धावणार आहे. शनिवार (दि. १९)पासून राजधानी एक्स्प्रेस सुरू होत आहे.मुंबई सीएसटी ते हजरत निजामुद्दीनपर्यंत शनिवारी राजधानी एक्स्प्रेसची पहिली फेरी सुरू होत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता राजधानी एक्स्प्रेसचे तिकीट आरक्षण सुरू झाले. प्रवाशांचा राजधानी एक्स्प्रेसला असाच प्रतिसाद मिळाला आहे.मुंबई-सीएसटी येथून दर बुधवारी व शनिवारी दुपारी २.५० वाजता निघणारी राजधानी एक्स्प्रेस ३.३६ ला कल्याण, ५.२२ वाजता इगतपुरी रेल्वे स्थानकावर स्टाफ बदलण्यासाठी २ मिनिटांचा टेक्निकल हॉल्ट, ५.५६ ला नाशिकरोड, रात्री ८.१७ ला जळगाव, रात्री २ भुसावळ, दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२६ ला झाशी, ७.५५ ला आग्रा कॅन्ट, १०.२० वाजता हजरत निजामुद्दीन (दिल्ली) येथे पोहचेल.तसेच दर गुरुवारी व रविवारी हजरत निजामुद्दीन दिल्ली येथून दुपारी ४.१५ ला निघणारी राजधानी एक्स्प्रेस आग्रा कॅन्टला ६.१५, झाशीला रात्री ८.५८, भोपाळला रात्री १२.१०, जळगावला दुसºया दिवशी पहाटे ५.३८, नाशिकरोड ८.१८, कल्याण १०.४८ व सीएसटी मुंबईला दुपारी ११.५५ ला पोहणार आहे.मुंबई सीएसटी येथून दिल्ली निजामद्दीन येथे जाणाºया राजधानी एक्स्प्रेसचे शनिवारी सायंकाळी ६ वाजता नाशिकरोडला स्वागत करण्यात येणार आहे. याकरिता खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे.नाशिकरोडला १३५ बर्थचा कोटासंपूर्ण वातानुकूलित असलेल्या राजधानी एक्स्प्रेसला नाशिकरोड रेल्वेस्थानकासाठी १३५ बर्थचा कोटा देण्यात आला आहे. फर्स्ट एसी-४ बर्थ (प्रति बर्थ भाडे ४६७० रुपये), सेकंड एसी-२८ बर्थ (प्रति बर्थ भाड २७९० रुपये), थ्रीटायर एसी-१०३ बर्थ (प्रति बर्थ भाडे २०१५ रुपये) असल्याची माहिती नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे मुख्य आरक्षण पर्यवेक्षक विजय तिवडे यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेRajdhani Expressराजधानी एक्स्प्रेस