शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘राज्यराणी’ नांदेडपर्यंत नेण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:11 IST

मनमाड-सीएसटी राज्यराणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाकडून राज्यराणी नांदेड-सीएसटी चालविण्याचा घाट घातला जात आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचा विरोध : रेल्वेची परतीची वेळ बदलण्याची मागणी

नाशिकरोड : मनमाड-सीएसटी राज्यराणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाकडून राज्यराणी नांदेड-सीएसटी चालविण्याचा घाट घातला जात आहे. राज्यराणीची परतीची वेळ बदलावी, दादरला थांबा देऊन प्रायोगिक तत्त्वावर गाडी चालवून निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.नाशिककरांसाठी मुंबई-ठाणे आदि भागात दररोज ये-जा करण्यासाठी राज्यराणी, पंचवटी, गोदावरी या तीनच गाड्या आहेत. राज्यराणीला लासलगाव, निफाड व सर्वांत महत्त्वाचा दादर थांबा नाही. तसेच सीएसटीवरून येणारी राज्यराणीची वेळ चुकीची असल्याने तिला प्रवाशांचा योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे नांदेड-सीएसटी राज्यराणी करून तसे वेळापत्रक करण्याचा घाट घातला जात आहे.तत्कालीन स्व. माजी खासदार डॉ. वसंत पवार यांनी नाशिककरांना मनमाड-सीएसटी तपोवन एक्स्प्रेस मिळवून दिली होती. काही वर्षे मनमाड-सीएसटी चाललेली तपोवन एक्स्प्रेस पुढे नांदेड-सीएसटी करण्यात आली. मध्य रेल्वेची वर्षभर चालणारी ही एकमेव गाडी असून नांदेडवरूनच भरून येणाऱ्या तपोवनमध्ये नाशिककरांची हक्काची तपोवन पाठोपाठ मनमाड-पुणे रेल्वे भुसावळ-पुणे करण्यात आली. आता रेल्वे प्रशासनाकडून नाशिककरांची हक्काची व गरजेची राज्यराणी पळविण्याचा घाट घातला जात आहे.‘राज्यराणी’ची परतीची वेळच चुकीचीमनमाडवरून पहाटे ५.२५ ला सुटणारी राज्यराणी नाशिकला ६.१३ व सीएसटीला १०.०७ ला पोहचते. मात्र तिला येताना-जाताना लासलगाव, निफाड, दादर थांबा दिलेला नाही. राज्यराणी सायंकाळी सीएसटीवरून ६.४५, नाशिकला रात्री १०.१५ व मनमाडला रात्री ११.२५ ला पोहचते. सीएसटीवरून नाशिकला येण्यासाठी दुपारी ३ वाजता सेवाग्राम, ४.३० वाजता नंदीग्राम, ६.१५ ला पंचवटी, ६.४५ ला राज्यराणी, ७ वाजता विदर्भ आहे. मुंबईत व्यापाºयांची कामे ५ वाजेपर्यंत संपून जातात. तर शासकीय कार्यालय सायंकाळी ६ वाजता सुटत असल्याने पंचवटी व त्यापूर्वी असलेल्या रेल्वेंना येणाºया प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे राज्यराणीला येणारे प्रवासी जास्त शिल्लक राहत नसल्याने प्रतिसाद मिळत नाही. नंदीग्राम व पंचवटी या दोन गाड्यांमध्ये पावणेदोन तासांचा कालावधी असून, यामध्ये सीएसटीवरून राज्यराणी सोडल्यास तिचा खºया अर्थाने प्रवाशांना व पर्यायाने रेल्वेलादेखील फायदा होईल.दादर महत्त्वाचे ठिकाणनाशिकहून मुंबईला जाणारे बहुतांश प्रवासी हे दादरलाच उतरतात. अत्यंत कमी प्रवासी सीएसटीला उतरतात. दादरला उतरल्यावर प्रवाशांना पश्चिम रेल्वेलाइनवरील अंधेरी, बोरिवली, मुंबई सेंट्रल, चर्चगेट व हार्बर लाइनवरील कुर्ला, चेंबूर, वडाळा आदी ठिकाणी जाणे सोपे होते. मात्र राज्यराणीला दादर थांबा नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळतो.

टॅग्स :railwayरेल्वेNashikनाशिकNandedनांदेड