राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेस गुरुवारीही रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:27 IST2017-09-22T00:26:46+5:302017-09-22T00:27:45+5:30
मुंबई भागात होत असलेल्या पावसामुळे गुरूवारी मनमाडहून मुंबईला जाणारी राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. मुंबईहून येणाºया काही रेल्वे थोड्या उशिराने धावत होत्या.

राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेस गुरुवारीही रद्द
नाशिकरोड : मुंबई भागात होत असलेल्या पावसामुळे गुरूवारी मनमाडहून मुंबईला जाणारी राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. मुंबईहून येणाºया काही रेल्वे थोड्या उशिराने धावत होत्या.
मुंबई परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी रेल्वे वेळापत्रक बिघडले आहे. गुरूवारी दुसºया दिवशी मनमाडहून मुंबईला जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. तर गोदावरी एक्स्प्रेस मनमाडवरून नाशिकरोड पर्यंतच सोडण्यात येऊन सायंकाळी तिच्या निर्धारित वेळेला नाशिकरोडहून मनमाडकडे रवाना झाली. तसेच येणाºया-जाणाºया काही रेल्वे निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे नियोजन चुकत असून, त्यामुळे सर्व प्रवासी त्रस्त झाले आहेत.