मोहाडी ग्रामपालिका सरपंचपदी राजाराम जाधव यांची अविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 17:42 IST2019-12-03T17:42:09+5:302019-12-03T17:42:48+5:30
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी ग्रामपालिका सरपंचपदी राजाराम जाधव यांची अविरोध निवड करण्यात आली. सुरेश गावित यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर आवर्तन पद्धतीने ही निवड करण्यात आली.

नूतन सरपंच जाधव यांचा सत्कार
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी ग्रामपालिका सरपंचपदी राजाराम जाधव यांची अविरोध निवड करण्यात आली. सुरेश गावित यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर आवर्तन पद्धतीने ही निवड करण्यात आली.
यावेळी उपसरपंच बाकेराव मौले, ग्रामपालिका सदस्य रविंद्र जाधव, जिजाबाई नेहरे, रत्ना क्षीरसागर, अनिता पाटील, विनता देशमुख, विमल महाले, सीता जोपळे, शितल माळी, सविता पवार, सायली निकम, कैलास कळमकर, बाबा निकम, अनिल जाधव, किरण नाईक, सुरेश गावित आदींनी राजाराम जाधव यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला.
निवडणूक निर्णय अधिकारी विधाते यांच्याकडे सरपंचपदाचा एकमेव अर्ज आल्याने त्यांनी राजाराम धर्मा जाधव यांची सरपंचपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर नूतन सरपंच जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य विलास देशमुख, प्रवीण जाधव, सुदर्शन जाधव, सुनील निकम, बाळू निकम, बाळासाहेब कळमकर, ग्राम विकास अधिकारी सुधाकर जगताप, तलाठी साहेबराव भामरे, सतीश पोटींदे, संजय वाघ, निवृत्ती जाधव, जयश्री जाधव, पल्लवी ठाकरे आदी उपस्थित होते.