राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली होती. मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला होता. याची दखल घेत तहसीलदारांनी बुधवारी टँकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको स्थगित केला. तहसीलदार नरेशकुमार बहिरम, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब भापकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावला. गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडली आहे. पाणीपुरवठा योजनेलगत खैराबाई पाझर तलाव आहे. या तलावातून संपूर्ण पाणी उपसा होत असल्याने पाणीपुरवठ्याची विहिरी व बोअरवेल कोरडेठाक पडले आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाझर तलावातील पाणी आरक्षित करावे असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. मात्र पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. या योजनेसाठी लाखो रु पये खर्च केले जातात; मात्र उन्हाळ्यात पाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे टॅँकर सुरू करण्याची मागणी केली होती, मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मागणीची दखल घेत तहसीलदारांनी टॅँकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. निवेदनावर अशोक आव्हाड, सुखदेव मगर, त्र्यंबक वाघ, राहुल कासार, विठ्ठल जाधव, गायत्री सोनवणे, रजनी वाघ, अशोक मुंढे, शिल्पा धात्रक, योगीता घुगे, सरला ठाकरे आदींच्या सह्या आहेत. आंदोलनाशिवाय पाणी मिळणार आहे, अशी भावना राजापूरच्या जनतेची झाली आहे.
राजापूरला तीव्र पाणीटंचाई दखल : टँकर सुरू करण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:09 IST
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली होती.
राजापूरला तीव्र पाणीटंचाई दखल : टँकर सुरू करण्याचे आश्वासन
ठळक मुद्देटँकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको स्थगितपाणीपुरवठ्याची विहिरी व बोअरवेल कोरडेठाक पडले