राज ठाकरे यांचा ‘धावता’ दौरा

By Admin | Updated: March 2, 2015 00:05 IST2015-03-01T23:50:14+5:302015-03-02T00:05:13+5:30

राज ठाकरे यांचा ‘धावता’ दौरा

Raj Thackeray's 'Runya' tour | राज ठाकरे यांचा ‘धावता’ दौरा

राज ठाकरे यांचा ‘धावता’ दौरा

नाशिक : दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यासाठी आलेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी दोन कार्यक्रमांना हजेरी लावत पाच तासांतच आपला दौरा गुंडाळत मुंबईला प्रयाण केले. आता दि. १२ किंवा १३ मार्च रोजी राज ठाकरे पुन्हा एकदा नाशिक भेटीवर येणार असून, त्यावेळी संघटनात्मक बदलासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
सुमारे महिनाभरानंतर राज ठाकरे रविवारी नाशिक दौऱ्यावर आले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन झाले त्यावेळी महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समितीचे माजी सभापती राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, माजी आमदार उत्तमराव ढिकले, माजी महापौर यतिन वाघ आणि डॉ. प्रदीप पवार यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राज ठाकरे यांनी नाशिकरोड येथे वीज कामगार सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन आणि महात्मा फुले कलादालनात मनसेच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सवाला हजेरी लावल्यानंतर लागलीच मुंबईकडे प्रयाण केले. नियोजित दौऱ्यानुसार राज ठाकरे कार्यक्रमांना उपस्थिती लावण्याबरोबरच महापालिकेच्या कामकाजाचाही आढावा घेणार होते. याशिवाय महापालिका आयुक्तांसमवेतही चर्चेचे नियोजन होते, परंतु मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे सोमवारी जळगाव येथे न्यायालयीन कामासाठी जाणार असल्याने त्यांची भेट होऊ शकणार नसल्याचे समजताच राज ठाकरे यांनी आपला दौरा आटोपता घेतला. आता ते दि. १२ किंवा १३ मार्चला पुन्हा एकदा नाशिकला येणार आहेत.

Web Title: Raj Thackeray's 'Runya' tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.