सरकारी कार्यालयातील कामकाज मराठीतून व्हावे मनसे : तहसीलदारांसह शासकीय अधिकाºयांना दिले राज ठाकरे यांचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:19 IST2018-01-05T00:16:14+5:302018-01-05T00:19:54+5:30
पेठ : मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून मराठीची अस्मिता जपण्यासाठी यापुढे तहसील कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज व पत्रव्यवहार मराठी भाषेतून करण्यात यावेत, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केले आहे.

सरकारी कार्यालयातील कामकाज मराठीतून व्हावे मनसे : तहसीलदारांसह शासकीय अधिकाºयांना दिले राज ठाकरे यांचे पत्र
पेठ : मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून मराठीची अस्मिता जपण्यासाठी यापुढे तहसील कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज व पत्रव्यवहार मराठी भाषेतून करण्यात यावेत, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केले आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, उपतालुका प्रमुख निवृत्ती वाघमारे, गटप्रमुख हिरामण मौळे, गणप्रमुख रावजी काकड, कमलाकर चारस्कर, श्याम काळे, प्रवीण पवार, रोहिदास गवळी, मंदा बाºहे, हिरामण पवार, संजय फसाळे, हिरकूड बाबा यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
सामान्य नागरिकांचे हेलपाटे व्हावे कमी...
मनसेचे पेठ तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत यांच्या उपस्थितीत पेठ शहरातील तहसीलदारांसह शासकीय कार्यालयांना राज ठाकरे यांच्या पत्राचे वाटप करण्यात आले. सामान्य मराठी माणसाच्या किरकोळ कामासाठी त्याचे शासकीय कार्यालयातील हेलपाटे कमी करून जास्तीत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे. शासकीय कार्यालये, बँका, सहकारी संस्थांना राज ठाकरे यांच्या पत्राचे वाटप करण्यात आले.