शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

राज ठाकरे ट्रोल होताहेत, याचा अर्थ धडकी भरली!

By किरण अग्रवाल | Updated: April 21, 2019 01:18 IST

निवडणूक प्रचाराच्या उत्तरार्धात जिल्ह्यात नरेंद्र मोदी व राज ठाकरे यांच्या सभा होणार असल्या तरी अधिक उत्सुकता आहे ती राज यांच्याच सभेची. कारण यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या ‘मनसे’ला पूर्ववत आपले ‘बळ’ सिद्ध करण्यासाठी आजची रंगीत तालीम परिणामकारी ठरविणे राज यांच्याकरितादेखील महत्त्वाची आहे.

ठळक मुद्दे भविष्यकालीन उद्दिष्टपूर्तीसाठी ‘मनसे’चे बळ परिणामकारी ठरविण्याकरिता ही रंगीत तालीमच प्रचाराचा ज्वर अगदी शिगेला पोहचलामोदी यांच्या सभेपेक्षाही राज ठाकरे यांच्या सभेबद्दलचे औत्सुक्य अधिक

सारांशकाळाच्या साथीने व गतीने पुढे जाताना यंदा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्ष व उमेदवारांनी अभिनवता अवलंबिलेली दिसते आहे, विशेषत: राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या बदलत्या भूमिकेचे व चुकांचे तंत्रशुद्ध पद्धतीने जे वस्रहरण चालविले आहे, तो प्रकार कमालीच्या उत्सुकतेचा ठरला आहे. यामुळे हबकलेल्या, गोंधळलेल्या व गडबडलेल्या सत्ताभक्तांनी समाजमाध्यमात राज यांना ‘ट्रोल’ करणे सुरू केल्याने ही बाब सत्ताधा-यांच्या उरात धडधड सुरू झाल्याचेच निदर्शक ठरावी.लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला असून, राज्यात अजून २३ व २९ एप्रिलला मतदानाचे दोन चरण पार पडावयाचे बाकी आहेत. यात एकूण ४८ पैकी उर्वरित ३१ मतदारसंघांसाठीचे मतदान होणार आहे. त्यानंतरही देशातील तीन टप्पे पार पडतील. राज्याचाच विचार करता, प्रचाराचा ज्वर अगदी शिगेला पोहचला आहे. उमेदवारांनी अर्ज भरेपर्यंत फारसा उत्साह दिसत नव्हता, मात्र त्यानंतर आता प्रचाराने वेग घेतला आहे. यात यंदा जाहीर प्रचार तसा मर्यादेत होत असताना, वैयक्तिक प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी समाजमाध्यमांवर खरे रण माजलेले दिसत आहे.जिल्ह्याच्याच बाबतीत बोलायचे तर, जाहीर प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आदींच्या सभा झाल्याने बºयापैकी वातावरण तापले आहे. परंतु आता अखेरच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व ‘मनसे’चे नेते राज ठाकरे यांच्या होऊ घातलेल्या सभांची उत्सुकता दाटली असून, त्या सभा खºयाअर्थाने मत‘निश्चिती’ला कामी येण्याची अपेक्षा आहे.महत्त्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदी यांच्या सभेपेक्षाही राज ठाकरे यांच्या सभेबद्दलचे ेऔत्सुक्य अधिक आहे. याचे पहिले कारण म्हणजे मोदींच्या नेहमीच्या त्याच त्या, ‘भाईयो और बहनो...’ म्हणत केल्या जाणाºया संबोधनात नावीन्य काही राहिलेले नाही. बंगालमध्ये गेले की ममता बॅनर्जींवर टीका आणि महाराष्ट्रात आले की शरद पवार यांच्यावर निशाणा, याखेरीज नवीन काही हाती लागत नाही. राज यांनी मात्र प्रचारात नवीन ‘फार्म’ आणला आहे. लहान बैठकीत अथवा सभागृहातील कार्यक्रमात सादरीकरण करावे त्यापद्धतीने जाहीर सभांमध्ये ते ‘ऐ लाव रे व्हिडीओ...’ म्हणत जे काही दाखवू लागले आहेत, त्याने उपस्थितांची मने काबीज होताना दिसत आहे. पारंपरिक भाषणबाजी, त्यातील टाळ्याखाऊ विधाने वा नक्कला या नेहमीच्याच झाल्या. परंतु यंदा हा नवीनच प्रकार राज यांनी पुढे आणला, त्यामुळे तो उत्सुकतेचा व परिणामी चर्चेचा विषयही ठरून जाणे स्वाभाविक ठरले आहे.दुसरे म्हणजे, नाशिकच्या संदर्भाने राज यांच्या सभेबाबतचे औत्सुक्य यासाठीही आहे की, गेल्या वा त्याहीपूर्वीच्या म्हणजे २००९च्या लोकसभा निवडणुकीत ज्या भुजबळांचे वाभाडे काढत त्यांनी परिणामकारक मते मिळविली होती, आज त्यांच्याच पथ्यावर पडण्यासाठी राज यांची सभा होणार आहे. यातील दखल घेण्याजोगी बाब म्हणजे, मुंबई - ठाण्यानंतर महाराष्ट्रात ‘मनसे’ला जी संधी लाभली व यापुढे दिसत आहे ती जागा नाशिक आहे. शिवाय, राज्यातील ठिकठिकाणी अजूनही ते नाशकात आपली म्हणजे त्यांच्या ‘मनसे’ची सत्ता असताना ‘करून दाखविल्याची’ उदाहरणे देत असतात. त्यामुळे नाशकातील निकाल राज यांच्याही वाटचालीवर परिणाम करणारा ठरू शकतो. येथे हे उघड आहे की, आज लोकसभेच्या निवडणुकीत ‘मनसे’ मैदानात नसली तरी उद्या होणाºया विधानसभेसाठी ती पूर्ण ताकदीनिशी रणांगणात उतरेल. तेव्हा, आजची भरपाई करून घेताना ज्या जागा त्यांच्या डोळ्यासमोर असतील त्यात नाशकातील गेल्यावेळी त्यांच्याच हाती राहिलेल्या जागांचा समावेश असणे स्वाभाविक आहे. त्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल करायची तर सत्ताधाºयांच्या विरोधातील कौल येथे लाभणे राज यांच्याही दृष्टीने अपेक्षेचे व आवश्यकतेचे ठरणारे आहे. म्हणूनच, नाशकात ते आणखी नवीन काय ‘दाखवतात’ याबद्दलची उत्सुकता आहे.यामुळेच सत्ताधाºयांना धडकी भरली असावी म्हणून, राज यांना सोशल मीडियात ‘ट्रोल’ केले जात आहे. हे ट्रोलिंग म्हणजे त्यांना टार्गेट करून नामोहरम करण्याचाच प्रयत्न आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा हे सोपेच आहे. अर्थातच, यामुळे राज अधिक आक्रमकतेने या साºया सत्ताभक्तांचा समाचार घेण्याची शक्यता वाढून गेली आहे. पण, असे ‘ट्रोलिंग’ करण्यातून संबंधितांनी राज यांचा धसका घेतल्याची बाब मात्र नक्कीच स्पष्ट व्हावी; किंबहुना इतके वा असे ते दखलपात्र ठरावेत हेदेखील राज ठाकरे यांच्यासाठी श्रेयस्करच म्हणता येणारे आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकPoliticsराजकारण