राज ठाकरे नाशकात दाखल
By Admin | Updated: November 28, 2014 00:03 IST2014-11-28T00:02:08+5:302014-11-28T00:03:12+5:30
गिते, ठाकरे अनुपस्थित

राज ठाकरे नाशकात दाखल
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस मुक्कामी दौऱ्यावर गुरुवारी रात्री उशिरा नाशकात दाखल झाले.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोषात स्वागत केले. यावेळी मात्र माजी प्रदेश सरचिटणीस वसंत गिते यांच्यासह अतुल चांडक व सचिन ठाकरे अनुपस्थित होते. सायंकाळी साडेपाच वाजता येणार असलेले ठाकरे रात्री ९ च्या सुमारास पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये थेट दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी महापौर अशोक मुतर्डक, माजी महापौर अॅड. यतिन वाघ, स्थायी समिती सभापती अॅड. राहुल ढिकले यांच्यासह बहुतांश नगरसेवक व जिल्हा पदाधिकारी हजर होते.