शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
2
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
3
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
4
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
5
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
6
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
7
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
8
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
9
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
10
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
11
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
12
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
13
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
14
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
15
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
16
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
17
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
18
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
19
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
20
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल

राज साहेब, नाशकात या.. खड्डे पहा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:39 IST

संपूर्ण राज्यात खड्डे झाले आहेत, परंतु नाशकात खड्डे नाही, हे मुंबई येथे जाहीर सभेत सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये यावे आणि खड्डे बघावे म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे सांगण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.

ठळक मुद्देकाळ बदलला; मनसेची सत्ता गेली, कुंभमेळा संपून झाली चार वर्षे

नाशिक : संपूर्ण राज्यात खड्डे झाले आहेत, परंतु नाशकात खड्डे नाही, हे मुंबई येथे जाहीर सभेत सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये यावे आणि खड्डे बघावे म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे सांगण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे यांची शनिवारी (दि.१२) मुंबईत सभा झाली. त्यावेळी त्यांनी सरकारच्या कामाचा समाचार घेताना नेहमीप्रमाणेच नाशिकमधील संदर्भ दिला. राज्यात सर्वत्र खड्डे पडले आहेत. मात्र नाशिकमध्ये खड्डे नाहीत, असे अजब विधान त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी महापालिकेतील मनसेच्या कारभाराचादेखील हवाला दिला. नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना ठेकेदारांना दम दिला होता त्यामुळे रस्ते चांगले झाल्याचा दावादेखील त्यांनी केला. त्यानंतर राज यांनी त्यावेळी राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीच्या वेळी मनसेने नाशिकमध्ये केलेली कामे दाखवताना गुळगुळीत रस्तेदेखील दाखवले होते. मात्र, त्यावेळच्या परिस्थितीत आणि आत्तापर्यंत मोठा बदल झाला आहे. मात्र २०१२-२०१७ दरम्यानच्या सत्ता काळातून राज हे बाहेर पडण्यास तयार नसल्याचेच त्यांच्या विधानातून दिसत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.२०१२ मध्ये नाशिक महापालिकेत मनसेची भाजपाच्या मदतीने सत्ता होती. त्याचवेळी २०१४-१५ नाशिकमध्ये कुंभमेळा होता. महापालिकेने एक हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यात राज्य शासनाने ७० टक्के निधी दिला. त्यातून कुंभमेळ्याची कामे करता आली. महत्त्वाची बाब म्हणजे त्यावेळी प्रवीण गेडाम हे कर्तव्य कठोर आयुक्त होते आणि त्यांनी तीन तीन वेळा प्रत्येक कामाचे आॅडिट केले आणि त्यानंतर देयके दिली गेली. २०१७ मध्ये राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी राजयांनी याच कुंभमेळ्याच्या कामांचा हवाला देऊन गुळगुळीत रिंगरोड दाखवले होते.शनिवारी मुंबई येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केल्याने शहरातील त्यांच्या काळातील आणिआताच्या खड्डयांचे चित्र नाशिककरांसमोर उभे ठाकले. ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून नाशिकमधील विकासकामांचा मुद्दा नेहमीच उपस्थित केला आहे. त्यामुळे आगामी सभांमध्ये नाशिकचा विकास मुद्दा पुन्हा समोर आल्याचे बोललेजात आहे.खड्ड्यांचे स्मरणरंजनआता कुंभमेळा संपून चार वर्षे झाली असून, तीन वर्षे ठेकेदाराकडील दायित्व संपत नाही तोच खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था झाली आहे. चालू वर्षी पाऊस संपूनही खड्डे जैसे थे असताना राज यांनी मनसेच्या काळातील स्मरण रंजनाच्या आठवणी आजच्या स्थितीत सांगितल्याने नाशिककरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरे