रायते शिवारात बस-कार अपघातात एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:12 IST2021-06-20T04:12:13+5:302021-06-20T04:12:13+5:30

नैताळे ता. निफाड येथून येवल्याकडे येणाऱ्या अल्टो कारचे (क्रमांक एमएच ०२ बीजे ९२४३) टायर फुटले. कार औरंगाबाद येथून नाशिककडे ...

Raite killed on the spot in a bus-car accident in Shivara | रायते शिवारात बस-कार अपघातात एक जागीच ठार

रायते शिवारात बस-कार अपघातात एक जागीच ठार

नैताळे ता. निफाड येथून येवल्याकडे येणाऱ्या अल्टो कारचे (क्रमांक एमएच ०२ बीजे ९२४३) टायर फुटले. कार औरंगाबाद येथून नाशिककडे चाललेल्या एसटी बसवर (क्रमांक एमएच ४० एन ८८००) आदळली. सदर घटना येवला-नाशिक महामार्गावर रायते शिवारात शनिवारी, (दि. १९) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून, कार चालक संजय नाना बारे (३०, रा. आंबेवाडी ता. निफाड) जागीच ठार झाला. कारमधील योगेश बोरगुडे (३५, रा. नैताळे ता. निफाड), राजेंद्र शिरसाठ (४०, रा. आंबेवाडी ता. निफाड) हे गंभीर जखमी झाले. तर बसमधील प्रवासी भाग्यश्री विकास बनबेहरे रा. औरंगाबाद, महालिंग नंदू जंगम रा. ओझर ता. निफाड हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिक धावून आले. जखमींना बाहेर काढण्यासाठी त्यांनी मदत केली. जखमींवर येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

फोटो- १९ रायते ॲक्सीडेंट १/२

===Photopath===

190621\19nsk_62_19062021_13.jpg~190621\19nsk_63_19062021_13.jpg

===Caption===

फोटो- १९ रायते ॲक्सीडेंट १/२~फोटो- १९ रायते ॲक्सीडेंट १/२

Web Title: Raite killed on the spot in a bus-car accident in Shivara