लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी सोसायटी ठेवीदार समितीने विविध मागण्यांसाठी सोमवारी अपर जिल्हाधिकारी कचेरीसमोर लाक्षणिक आमरण उपोषणास प्रारंभ केला. रायसोनी पतसंस्थेत जमा केलेल्या ठेवींचे पैसे व्याजासह परत मिळावेत. आरोपींना त्वरित अटक करावी या मागणीसाठी अनिल पाठक यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास प्रारंभ झाला. यावेळी विविध ठेवीदारांची भाषणे झाली. रायसोनी सोसायटीच्या शाखेचे संचालक, सल्लागार मंडळ व शाखाधिकारी यांना अटक करावी, ठेवीदारांचे पैसे व्याजासह परत मिळावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अनिल पाठक, सुकदेव गोविंद, इंदूबाई गोविंद, शरद देवरे, सुनील बाविस्कर आदि उपस्थित होते.
रायसोनी सोसायटी ठेवीदार समितीचे आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:27 IST