नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईच्या रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इंग्रजकाळातील वास्तूवरील व्हिक्टोरीया राणीचा पुतळा काढण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राज्याच्या राजधानी मुंबईच्या अतीमहत्त्वाचे रेल्वेस्थानकाचे नामकरण करण्यात आले आहे; मात्र या रेल्वेस्थानकाच्या इमारतीवर व्हिक्टोरीया राणीचा पुतळा आजही पहवयास मिळतो. सदर पुतळा हटवून त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला जावा, असे निवदेनात म्हटले आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीचे प्रतिक असलेला हा पुतळा त्वरीत हटवावा य १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महराज जयंतीच्या औचित्यावर त्यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे केली आहे. सदर निवेदन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या नावाने देण्यात आाले आहे. हा पुतळा हटविण्यात आला नाही तर संघटनेच्या वतीने व्हिक्टोरीया राणी पुतळा हटाव आंदोलन करण्याचा इशारा निवदेनातून देण्यात आला आहे. निवेदनावर अजीज पठाण, माधुरी भदाणे, योगेश मिसाळ, इब्राहीम अत्तार, रफिक साबीर, बशीर शेख आदि पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.
शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा : मुंबईच्या ‘सीएसटी’वरील राणी व्हिक्टोरीयाचा पुतळा इंग्रज गुलामगिरीचे प्रतीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 17:08 IST
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईच्या रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इंग्रजकाळातील वास्तूवरील व्हिक्टोरीया राणीचा पुतळा काढण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राज्याच्या राजधानी मुंबईच्या अतीमहत्त्वाचे रेल्वेस्थानकाचे नामकरण करण्यात आले आहे; मात्र या रेल्वेस्थानकाच्या इमारतीवर व्हिक्टोरीया राणीचा पुतळा आजही पहवयास मिळतो. सदर पुतळा हटवून त्या जागेवर छत्रपती ...
शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा : मुंबईच्या ‘सीएसटी’वरील राणी व्हिक्टोरीयाचा पुतळा इंग्रज गुलामगिरीचे प्रतीक
ठळक मुद्देरेल्वेस्थानकाच्या इमारतीवर व्हिक्टोरीया राणीचा पुतळा आजही पहवयास मिळतो रेल्वेस्थानकाचे नामकरण करण्यात आले १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महराज जयंतीच्या औचित्यावर त्यांचा पुतळा उभारावा