शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आपण हिंदू आहोत लक्षात ठेवा, PM मोदींचा 'एक है तो सेफ है' नारा बुलंद करा - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 08:50 IST

ब्राह्मण समाजाचे कार्य दुधात साखरेप्रमाणे असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

CM Devendra Fadnavis: राजकारणात संख्या महत्त्वाची असते. या विषयावर नेहमीच चर्चाही होते. परंतु दुधात साखर टाकली की दूध जसे गोड होते, तोच गोडवा निर्माण करणारे कार्य चित्तपावन ब्राह्मण समाजाने केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजतागायत प्रत्येक क्षेत्रात ब्राह्मण समाजाने उन्नती साधली आहे. हाच इतिहास नवीन पिढीने कायम ठेवावा, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे चित्तपावन ब्राह्मण संघाने उभारलेल्या 'श्री परशुराम भवन' या नूतन वास्तूच्या लोकार्पणावेळी केले. यावेळी पंतप्रधान मोदींचा 'एक है तो सेफ है' हा नारा बुलंद करा असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"महाराष्ट्राच्या व भारताच्या संपूर्ण इतिहासात समाजाच्या सर्वच क्षेत्रात चित्पावन ब्राह्मण समाजातील लोक अग्रणी असल्याचे दिसते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य वाढवण्यापासून ते भारतीय स्वातंत्र्यलढा, समाजातील सुधारणावादी क्षेत्र, कला व साहित्य क्षेत्रातील पहिल्या १० नावांमध्ये किमान ३ ते ४ चित्पावन ब्राह्मण समाजातील सापडतात. अतिशय बुद्धिमान व मेहनती असलेल्या चित्पावन ब्राह्मण समाजातील अनेक लोक अतिशय विषम परिस्थितीतून, सामान्य, मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबातून स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे आलेले पाहतो," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"समाजात जातीव्यवस्था असू नये, असे म्हणण्यापेक्षा जातीय विषमता असू नये असे म्हटले तर चांगले होईल. ही विषमता दूर करणे सर्वांची जबाबदारी आहे. ब्राह्मण समाजाची लोकसंख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असल्याचे म्हटले जाते. पण ब्राह्मण समाज दूधात साखरेप्रमाणे असून चिमूटभर साखरेमुळे दूध गोड लागते. त्याप्रमाणे समाजात गोडवा निर्माण करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. समाजाला उपयुक्त अशी व्यवस्था निर्माण करायची आहे. समाजाच्या व देशाच्या विकासात चित्पावन ब्राह्मण समाजाचे ऐतिहासिक योगदान राहिले असून तशीच पुढची पिढी निर्माण होईल, असे संस्कार करण्याची आवश्यकता आहे," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

"चित्पावन ब्राह्मण समाजातील लोकांनी ऐतिहासिक काळापासून केवळ स्वतःचा विचार केला नाही, तर समाजाच्या विविध क्षेत्रात सर्वांना उपयुक्त ठरतील अशा गोष्टी केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक है तो सेफ है' हा मंत्र दिला असून त्याचा अर्थ आपण सर्वच सनातन विचार मानणारे आहोत. म्हणूनच आपण केवळ जातीचा, पंथाचा विचार न करता एकत्वाची भावना मनात असणे गरजेचे आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNashikनाशिक