पावसाळी अधिवेशनात अनेक कामे मार्गी लागतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST2021-06-21T04:11:36+5:302021-06-21T04:11:36+5:30
कादवा सहकारी साखर कारखान्यावर व्यापारी संकुलाचे भूमिपूजन नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कादवाचे ...

पावसाळी अधिवेशनात अनेक कामे मार्गी लागतील
कादवा सहकारी साखर कारखान्यावर व्यापारी संकुलाचे भूमिपूजन नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. यावेळी नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, श्रीराम शेटे यांनी सांगितले, नरहरी झिरवाळ यांनी सामाजिक जीवनात काम करताना नेहमीच जनतेत राहून जनतेचे प्रश्न सोडवीत मतदारसंघाचा विकास केला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पावती म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा आमदार केले. पक्षानेही विधानसभा उपाध्यक्ष म्हणून संधी दिली. झिरवाळ राज्यातील विविध प्रश्न सोडविण्याबरोबरच मतदारसंघातही विकासाची गंगा आणून सर्वांगीण विकास साधतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील आदींची भाषणे झाली.
इन्फो
गुरू माउलींकडून अभीष्टचिंतन
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रास भेट देत गुरू माउली अण्णासाहेब मोरे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी गुरू माउलींनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, रघुनाथ गायकवाड, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, अविनाश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - २० नरहरी झिरवाळ
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा सत्कार करताना श्रीराम शेटे. समवेत आमदार दिलीप बनकर, गणपतराव पाटील आदी.
===Photopath===
200621\20nsk_30_20062021_13.jpg
===Caption===
फोटो - २० नरहरी झिरवाळ विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा सत्कार करताना श्रीराम शेटे. समवेत आमदार दिलीप बनकर, गणपतराव पाटील आदी.