जोरण परिसरात रिमझिम पाऊस
By Admin | Updated: October 11, 2015 22:14 IST2015-10-11T22:14:31+5:302015-10-11T22:14:56+5:30
जोरण परिसरात रिमझिम पाऊस

जोरण परिसरात रिमझिम पाऊस
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील जोरण,
किकवारी, कपालेश्वर आदि गावांमध्ये रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला
सुरुवात झाली. त्यामुळे परिसरातील कापणीला आलेल्या खरीप
पिकांना या पावसाचा फटका बसण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
परिसरातील बाजरी, मका, भुईमूग या पिकांची कापणी चालू आहे. पावसामुळे कापणीच्या कामात अडसर निर्माण झाला असून, शेतकऱ्यांच्या हतातोंडाशी आलेल्या घास हिरावला जाण्याची भीती आहे. आधीच अवकाळी पाऊस, गारपिटीनंतर भरपावसाळ्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने बळीराजाचे नियोजन पुरते कोलमडले आहे. (वार्ताहर)