शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

त्र्यंबकेश्वरला पर्जन्यवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:23 IST

परिसरात गेल्या दोन दिवासांपासून सुरू असलेल्या प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आला असून, गावात पाणी शिरले आहे. यामुळे वाहनधारक व दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंची गैरसोय झाली. अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील नागरिकांची पुराच्या पाण्यामुळे तारांबळ उडाली.

त्र्यंबकेश्वर : परिसरात गेल्या दोन दिवासांपासून सुरू असलेल्या प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आला असून, गावात पाणी शिरले आहे. यामुळे वाहनधारक व दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंची गैरसोय झाली. अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील नागरिकांची पुराच्या पाण्यामुळे तारांबळ उडाली.परिसरातील रस्त्यांवर श्रावण महिन्यात प्रचंड संख्येने येणाºया भाविकांच्या सोयीसाठी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स पाण्यामुळे एका जागेहून दुसºया ठिकाणी हलले. काही दुकानधारकांच्या वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्र्यंबकेश्वरला श्रावणी शनिवारनिमित्त येऊन मुक्कामी असलेल्या भाविकांना येथेच थांबून राहावे लागले. टॅक्सी व बससेवेवरही या पुराच्या पाण्याचा विपरीत परिणाम झाला. आतापर्यंत त्र्यंबकेश्वरला १८६० मिमी पावसाची नोंद झाली असून, अद्यापपावेतो पावसाळा संपला नसल्याने अजूनही जोरदार पावसाचे संकेत आहेत. त्यामुळे पावसाची सरासरी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्र्यंबकला जोरदार पाऊस पडला की, गंगासागर तलाव, अहिल्या धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत असते. अहिल्या धरण ओव्हरफ्लो झाले की, निदान अहिल्या नदी तरी वाहते पण गंगासागरचे पाणी थेट महाजन चौकातून गावात वाहते. त्यात म्हातार ओहळाची भर पडते. दुसरीकडे तेलगल्लीकडून येणाºया नीलगंगा ओहळ हे सर्व गोदावरीत एकत्र येऊन गावात पूर येतो. सर्वत्र पाणीच पाणी चहूकडे..! अशी परिस्थिती निर्माण होत असते. महाजन चौक, कुशावर्त परिसर, मेनरोड, भाजी मंडई, डॉ. आंबेडकर चौक आदी परिसरात सर्वत्र पाणी असते. कमरेएवढे पाणी असते. गावाबाहेर असलेल्या गोदावरी पुलावरून पाणी वाहत होते. तर पूर ओसरल्यावर घरात घुसलेले पुराचे पाणी उपसताना नागरिक दिसत होते. पूर यायचे अजून एक कारण म्हणजे पालिकेकडून समाधानकारकरीत्या पात्राची सफाई झालेली नाही.पाटोदा परिसरात पिकांना जीवदानपाटोदा : रविवारी सकाळपासून परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील बाजरी, मका, मूग, भुईमूग, सोयाबीन अशा पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून, पिकेही जोमदार आली आहेत. पावसाने उघडीप दिल्याने शेतातील ऐन फुलोºयात आलेल्या पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या होत्या. पिके वाया जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ऐन गरजेच्या वेळीच पावसाने हात दिल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पालखेड कालव्यातूनही रोटेशन सुरू आहे. ज्या शेतकºयांकडे व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देत होते; मात्र वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी पुरविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पिके जगविण्यासाठी शेतकºयांची मोठी धडपड सुरू होती. रविवारी सकाळपासून ठाणगाव, पिंपरी, कानडी, विखरणी, कातरणी, आडगाव रेपाळ पिंपळगाव लेप परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली़