सिन्नरला पर्जन्ययाग : चिंचखेडला श्रीगणेशाची आळवणी
By Admin | Updated: July 15, 2014 00:49 IST2014-07-14T22:34:30+5:302014-07-15T00:49:18+5:30
सिन्नरला पर्जन्ययाग : चिंचखेडला श्रीगणेशाची आळवणी

सिन्नरला पर्जन्ययाग : चिंचखेडला श्रीगणेशाची आळवणी
सिन्नरला पर्जन्ययाग : चिंचखेडला श्रीगणेशाची आळवणीपावसासाठी गणेशावर दगड-गोट्यांचा भार !पावसाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा आता पाऊस पडावा यासाठी भगवंताचा धावा करू लागला असून, चिंचखेड, ता. दिंडोरी येथील गुराख्यांनी गणपतीवर भार टाकत भरपूर पाऊस व्हावा यासाठी गणेशाला साकडे घातले आहे. चिंचखेड येथे गणेशाच्या माळावर गणपतीच्या मूर्तीवर दगड-गोट्यांचा भार ठेवून संकल्प केला की पाऊस पडतो, अशी येथील ग्रामस्थांची धारणा आहे. त्यानुसार गावातील गुराख्यांनी कादवाच्या पाण्याने गावातील देवदेवतांना अंघोळ घालत देवांची गावातून मिरवणूक काढली. प्रत्येक घरातून मीठ-मिरची मागून रोट तयार करून महाप्रसाद वाटप करण्यात आला.