पर्जन्य, धरणांनी गाठली बरोबरी
By Admin | Updated: August 12, 2016 00:53 IST2016-08-12T00:42:59+5:302016-08-12T00:53:32+5:30
पर्जन्य, धरणांनी गाठली बरोबरी

पर्जन्य, धरणांनी गाठली बरोबरी
मोठा दिलासा : यंदा टंचाईपासून मुक्ततानाशिक : जुलैच्या अखेरीस धडकलेल्या मान्सूनने आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्याची पाण्याची गरज पूर्ण केल्याने शासन-प्रशासनासह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात हजेरी ठेवून असलेल्या पावसाने वार्षिक सरासरीच्या ७९ टक्के इतकी नोंद केली, तर सलग सुरू असलेल्या पावसाने यंदा पहिल्यांदाच आॅगस्टमध्येच जिल्ह्यातील धरणे ७७ टक्केभरली आहेत.
तसे पाहिले तर जिल्ह्यातील लहान-मोठ्या एकूण २३ प्रकल्पांची (धरण) साठवण क्षमता ६५, ८७४ दशलक्ष घनफूट इतकी असून, सध्या त्यात ५०,५२२ दशलक्ष घनफूट इतका म्हणजेच ७७ टक्के साठा आहे, परंतु गेल्या दहा दिवसांपासून गंगापूरसह १९ धरणांमधून दरररोज हजारो क्यूसेक पाणी सोडले जात आहे, याच पाण्याची साठवणूक केली असते तर धरणे शंभर टक्केभरल्याचे चित्र होते. मात्र धरणांच्या क्षमतेच्या काही प्रमाणातच त्यात पाणी साठवण्याची तरतूद असल्यामुळे जोपर्यंत पाऊस सुरू आहे तोपर्यंत धरणांमधून विसर्ग सुरूच राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे, त्यामुळे धरणातून नद्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्याचा तसेच पाझर तलावे, साठवण बंधारे, कोल्हापूर टाइप बंधाऱ्यांमध्ये पाणी साठण्यास मदत होणार आहे. या शिवाय सिंचन क्षेत्रासाठी हेच पाणी उपयोगी पडणार असून, दरवर्षी साधारणत: डिसेंबरपासून भासणारी पाणीटंचाई कमी होईल, असा आशावाद आहे. धरणांत साठलेल्या पाण्याचे नियोजन आॅक्टोबर महिन्यात केले जाणार असून, त्यात पिण्यासाठी, शेतीसाठी आरक्षण ठेवून उर्वरित पाणी अन्य जिल्ह्णांना सोडले जाणार आहे, त्यामुळे किमान जिल्ह्णाची पुढील आठ महिन्यांच्या गरजेइतके पाणी मिळण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)