देवळालीगावात पावसासाठी पर्जन्य याग
By Admin | Updated: July 7, 2014 00:17 IST2014-07-07T00:06:09+5:302014-07-07T00:17:52+5:30
देवळालीगावात पावसासाठी पर्जन्य याग

देवळालीगावात पावसासाठी पर्जन्य याग
नाशिकरोड : सर्वत्र पावसाचे आगमन त्वरित होऊन सगळीकडे सुखसमृद्धी नांदावी, यासाठी देवळालीगाव श्री श्री शनिमंदिर येथे शनैश्वर मित्रमंडळ व जयंती उत्सव समितीच्या वतीने आज पर्जन्य यज्ञयाग महापूजा करण्यात आली.
महापूजा सुषमा बाथम, भूषण बाथम, सपना शेळके, विश्वनाथ शेळके यांच्या हस्ते करण्यात आली. विश्वनाथ स्वामी यांनी मंत्रोच्चार केले. यावेळी अॅड. शांताराम कदम, मंगेश लांडगे, बापू फडोळ, मनोहर कोरडे, आतिष कदम, बाळनाथ सरोदे, गणेश कडभाने, नीलेश लांडगे, श्रीकांत तिदमे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)