नीलमणी मंदिरात पर्जन्ययाग
By Admin | Updated: July 17, 2014 00:32 IST2014-07-16T22:49:29+5:302014-07-17T00:32:18+5:30
नीलमणी मंदिरात पर्जन्ययाग

नीलमणी मंदिरात पर्जन्ययाग
मनमाड शहराचे आराध्य दैवत नीलमणी गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पर्जन्ययाग करून वरुणराजाला साकडे घालण्यात आले. गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रींच्या मूर्तीस महाअभिषेक करून पूजन करण्यात आले. वेद मंत्राच्या जयघोषात पर्जन्य यज्ञ करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य श्री. व सौ . शेखर पांगूळ व रोहित कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. पूर्णाहुती, महाआरती, महाप्रसाद आदि कार्यक्रम झाले. हर्षल कुलकर्णी व ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केले.