मालेगाव शहर व तालुक्यात पावसाच्या कोसळधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:28 IST2021-09-02T04:28:53+5:302021-09-02T04:28:53+5:30

गेल्या ३ दिवसांपासून शहर व तालुक्यात दमदार पाऊस होत आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे पिके करपू लागली होती. मात्र, दमदार ...

Rainfall in Malegaon city and taluka | मालेगाव शहर व तालुक्यात पावसाच्या कोसळधारा

मालेगाव शहर व तालुक्यात पावसाच्या कोसळधारा

गेल्या ३ दिवसांपासून शहर व तालुक्यात दमदार पाऊस होत आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे पिके करपू लागली होती. मात्र, दमदार पाऊस झाल्यामुळे मका, कपाशी व इतर खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील अस्ताणे येथील नवल जिभाऊ सोनवणे, वजिरखेडे येथील महारू दौलत गायकवाड यांच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. तलाठी यांनी पंचनामा करून तसा अहवाल येथील तहसील कार्यालयात दिला आहे. तर आघार खुर्द येथे पृथ्वीराज धनसिंग ठोके यांच्या मालकीच्या बैलाचा पावसामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील झोपडपट्टी भागात तसेच कलेक्टरपट्टा भागातील नवी वस्ती, सोयगाव नव वसाहत भागात पावसाच्या पाण्याची निचऱ्याची सोय नसल्याने रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. नागरिकांना पावसाच्या पाण्यातून व चिखल तडवीत वाट काढावी लागत होती. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले होते.

फोटो फाइल नेम : ३१ एमएयूजी ०५ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील कलेक्टरपट्टा भागात पावसामुळे साचलेले पाणी जेसीबीच्या साहाय्याने नाल्याकडे काढताना मनपा कर्मचारी.

310821\31nsk_12_31082021_13.jpg

फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.

Web Title: Rainfall in Malegaon city and taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.