त्र्यंबक तालुक्यात पावसाने नुकसान
By Admin | Updated: July 15, 2016 22:09 IST2016-07-15T22:07:41+5:302016-07-15T22:09:52+5:30
बाफनविहीर : भाताच्या रोपांसह शेती गेली वाहून

त्र्यंबक तालुक्यात पावसाने नुकसान
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील बाफनविहीर वेळुंजे, हरसूल या गावातील घरांचे व शेतीचे पावसामुळे नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संबंधित गावचे मंडल अधिकारी, तलाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.
तालुक्यात या ठिकाणी काही घरांचे कौले, पत्रे उडून भिंत पडल्या आहेत. बाफनविहीर येथील १० शेतकऱ्यांची भाताची शेती उभ्या रोपांसह वाहून गेली आहे. आता त्या दहाही शेतकऱ्यांना नवीन बियाणेंसह दुबार पेरणी करावी लागणार आहे.
वेळुंजे येथे एका घराची
भिंत पडली असून, मोठे नुकसान
झाले आहे. वेळुंजे येथे आतापर्यंत ७५९ मि.मी.पाऊस पडला आहे.
या तीनही ठिकाणांचे नुकसानीचे पंचनामे अद्याप संबंधितांकडून
आले नसल्याने नुकसानीचा अंदाज आलेला नाही. त्र्यंबकला अद्यापही पावसाचे सातत्य कायम आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण ६९७ मि.मी.पाऊस झाला आहे. (वार्ताहर)